ETV Bharat / city

मनसेत इनकमिंग.. राज ठाकरेंच्या उपस्थितीत नवी मुंबईतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश - राज ठाकरेंच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेच प्रवेश

नवी मुंबईतून विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुणांनी आज मोठ्या संख्येने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यापार्श्वभूमीवर अन्य पक्षांना धक्का बसला आहे.

Incoming in MNS   In the presence of Raj Thackeray,
राज ठाकरेंच्या उपस्थितीत नवी मुंबईतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
author img

By

Published : Nov 9, 2020, 3:08 PM IST

Updated : Nov 9, 2020, 3:18 PM IST

मुंबई - नवी मुंबईतून विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुणांनी माेठ्या संख्येने आज कृष्णकुंज, दादर येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसेमध्ये भविष्य आहे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे व राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही पक्षात प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.

नवी मुंबईतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
आगामी नवी मुंबई निवडणुकांच्या तोंडावर मनसेत इनकमिंग -नवी मुंबई महापालिका निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मनसेत प्रवेश केला आहे. यामुळे विविध पक्षांना हा मोठा धक्का बसला आहे. मनसे नवी मुंबई शहर प्रमुख गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला आहे. या अगोदर वरळी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेची वाट धरली होती.कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याने, कामगार आभार मानण्यास कृष्णकुंजवर -लॉकडाऊनच्या काळात जिम मालक-चालक, मुंबईतील डबेवाले, ग्रंथालयवाले, मूर्तिकार, महिला अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यांचे प्रश्न थेट सरकारमधील मंत्र्यांशी बोलून व निवेदन देऊन सोडवले होते. ते देखील ठाकरे यांचे आभार मानण्यास कृष्णकुंजवर अनेक दिवसांपासून गर्दी करत आहेत. त्यात आज राज ठाकरे यांच्या प्रयत्नाने बेस्टच्या हंगामी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळाल्यामुळे सदर कामगार सुद्धा भेटायला आले होते.

Last Updated : Nov 9, 2020, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.