मुंबई - सलग तीन वर्षे आयसीएसईच्या परीक्षेत मुंबई विभागाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. आयसीएसईच्या दहावी परीक्षेत जुहूतील जमनाबाई नरसी स्कूलची जुही कजारिया ही देशात टॉपर ठरली आहे.
काउन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) या शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या (आयसीएसई)दहावी आणि (आयएससी)बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाले.
- फोरम संजनावाला (जमनाबाई नरसी स्कूल)
- अनुश्री चौधरी (कांदिवलीतील गुंडेचा एज्युकेशन अकॅडमी)
- यश भन्साळी (ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानिया स्कूल)
- अनुष्का अग्निहोत्री (मुंबईतील चिल्ड्रेन अकॅडमी)
नाशिक येथील विझडम इंटरनॅशनल स्कूलमधील दृष्टी अत्तारडे ही देशातील टॉपरमध्ये तिसऱ्या स्थानावर आली आहे. आयसीएसईच्या दहावीचा एकूण निकाल ९८.५४ टक्के तर आयएससी बारावीचा ९६.५२ टक्के निकाल लागला आहे. मागील निकालाच्या तुलनेत यंदा ०.३ टक्के निकालात वाढ झाली असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
आयएससीच्या परीक्षेत मुंबईची घसरण-
बारावीच्या म्हणजेच आयएससीच्या परीक्षेत देशात कोलकात्याचा देवांग अग्रवाल प्रथम आला आहे. तर मुंबईची मिहिका सामंत दुसरी आली आहे. तर या परीक्षेतील टॉपरमध्ये मुंबईची यंदा थोडीशी घसरण झाल्याचेही समोर आले आहे.