ETV Bharat / city

Case Has Been Transferred to CID : गिरीश महाजन प्रकरण सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

गिरीश महाजन यांच्या प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला होता. या संदर्भात प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा घेतला आहे. आता हे प्रकरण सीआयडीकडे ( CID ) तपासासाठी वर्ग केले ( Girish Mahajan Case ) आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी सभागृहात दिले.

author img

By

Published : Mar 14, 2022, 6:57 PM IST

गिरीश महाजन
गिरीश महाजन

मुंबई - आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप झालेले वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. तसेच हे प्रकरण आता तपासासाठी सीआयडीकडे ( CID ) देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse ) यांनी कायदा-सुव्यवस्था वरील चर्चेच्या उत्तरात दिली. दरम्यान, आज दिवसभरात अर्थ संकल्प यावर चर्चा होत असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मागील आठवड्यात स्टिंग ऑपरेशन केलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. यावरही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्त्तर दिले आहे.

विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डीटेक्टीव इजन्सी चालवता - जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले. यावेळी गृहमंत्र्यांनी फडणवीसांना याधीचे पेन ड्राईव्हचे दाखले दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपण पाच हजार विहिरीचे पेन ड्राईव्ह दिले होते. मागील आठवड्यात आपण एक अध्यक्ष यांना पेन ड्राईव्ह दिला, आजही आपण वक्फ बोर्डावर लांबे याची नियुक्ती कशी केली याचा एक पेन ड्राईव्ह दिला, विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डीटेक्टीव इजन्सी चालवता, असा टोला गृहमंत्री वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत लगावला आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणारच - फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, फडणवीस यांनी आज सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह संदर्भात बोलताना डॉ. तांबे यांची नियुक्ती सरकारने केलेली नाही तर निवडून आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सात हजार पदांची भरती करणार - पोलीस दलात नव्याने 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली तसेच आता पोलीस शिपायांना ही उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Devendra Fadnavis Pendrive bomb : देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात नवा पेन ड्राईव्ह बॉम्ब; 'वफ्फ बोर्डाच्या सदस्याचा दाऊदशी संबंध'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.