ETV Bharat / city

अंतिम वर्षांच्या परीक्षेचा तिढा सुटला, पण एटीकेटीचा पेच कायम

author img

By

Published : Jun 1, 2020, 2:13 AM IST

अंतिम वर्षाची परीक्षा न घेता मागील वर्षांतील गुणांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना गुण द्यावेत आणि त्यांचा निकाल लावला जाईल असे जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये निकालाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एटीकेटी लागलेली आहे. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षेत हे विद्यार्थी सरासरी गुणांमध्ये कसे उत्तीर्ण होतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mumbai
मंत्रालय

मुंबई - राज्यातील विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा तिढा आज सुटला. मात्र ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांमध्ये एटीकेटी लागलेली आहे, अशा तब्बल ४० टक्केच्या दरम्यान विद्यार्थी आहेत. त्यांच्या निकालाचा पेच कायम राहणार आहे. यामुळे येत्या काळात एटीकेटीवरून सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी अंतिम वर्षाची परीक्षा न घेता मागील वर्षांतील गुणांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना गुण द्यावेत आणि त्यांचा निकाल लावला जाईल असे जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये निकालाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एटीकेटी लागलेली आहे. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षेत हे विद्यार्थी सरासरी गुणांमध्ये कसे उत्तीर्ण होतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पुणे विद्यापीठात यंदा दोन लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाला नोंदणी केली असून त्यापैकी एक लाख विद्यार्थ्यांना एटीकेटी असल्याचे सूत्रांकडून समजते. तर मुंबई विद्यापीठामध्ये यंदा सुमारे सर्व शाखा मिळून दोन लाख तीन हजार ७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी ७३ हजार विद्यार्थ्यांना सत्र पाचमध्ये एटीकेटी लागलेली आहे. इतक्याच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी परीक्षा घेतलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एटीकेटी असण्याचा अंदाज विद्यापीठाकडून व्यक्त केला जात आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुणांमध्ये उत्तीर्ण होणे अवघड होईल असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून व्यक्त केले जात आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने दिलासा मिळावा म्हणून हा सर्व खटाटोप सुरू आहे. त्याला अर्थ राहणार नसल्याचेही बोलले जात आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षेला सरासरी पद्धतीने गुणांकन दिले तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना तर बसेलच याचबरोबर महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या निकालाचा टक्का घसरेल. याचा परीणाम भविष्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनांमध्ये दिसू शकेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. काही प्राचार्यांनी उशिरा का असेना परीक्षा घेणे उचित राहील असे मत व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.