ETV Bharat / city

Girls Missing In Mumbai : मुंबईत मुली असुरक्षित.. दोन वर्षात २ हजार ३७१ मुली झाल्या बेपत्ता

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला ( Womens Security In Mumbai ) आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईतून २ हजार ३७१ मुली बेपत्ता झाल्या ( 2371 Girls Missing Mumbai ) आहेत. गृह विभागाच्या आकडेवारीतून ( Home Department Statistics ) ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या मुलींच्या शोधासाठी पोलिसांकडून 'ऑपरेशन मुस्कान' राबवण्यात येत ( Operation Muskan By Mumbai Police ) आहे.

महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : Dec 29, 2021, 8:36 PM IST

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस महिला असुरक्षित होत आहे का? ( Womens Security In Mumbai ) असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबईत दोन वर्षात दोन हजारांपेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या आहेत. गृह विभागाच्या आकडेवारीनुसार ( Home Department Statistics ) मुंबईत प्रत्येक दिवसाला दोन अथवा तीन मुली बेपत्ता होत आहेत. २०१९ आणि २०२० या दोन वर्षात मुंबईत २ हजार ३७१ मुली बेपत्ता ( 2371 Girls Missing Mumbai ) झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राज्य सरकार गंभीर आहे?

राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर असल्याची माहिती राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येते. मात्र, आकडेवारीनुसार प्रत्यक्षात तसे दिसत नसल्याचे उघड होत आहे. मुंबई शहरात हरवलेल्या मुलींबाबतची माहिती राज्याच्या गृह विभागाने सभागृहात सादर केली. विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे यांनी मांडलेल्या माहितीनुसार बोईसर येथील एक मुलगी महिन्याभरापासून मिसिंग झाल्याची घटना वांद्रे येथे घडली होती. त्यानंतरच राज्यात हरवलेल्या मुलींची आकडेवारी त्यांनी सभागृहाकडे मागितली होती. त्यावर गृह विभागाने आकडेवारी दिली आहे.

पोलिसांचे 'ऑपरेशन मुस्कान'

वर्ष २०१९ मध्ये १४८२ मुली हरवल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामध्ये १४०० प्रकरणांमध्ये मुलींचा शोध लागला. २०२० मध्ये ८८९ प्रकरणांमध्ये ८४७ मुलींचा शोध लागला. तर २०२१ मध्ये ११५८ प्रकरणात १०४४ मुलींचा शोध लावण्यात गृह विभागाला यश आले. मुस्कान ऑपरेशनच्या माध्यमातून हा शोध लावला असल्याची माहिती देण्यात ( Operation Muskan By Mumbai Police ) आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.