मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या ( Mumbai Corona ) वाढत असताना जून महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात मलेरिया, डेंग्यू ( Dengue ), गॅस्ट्रोचे ( Gastrology ) रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनासह पावसाळी आजारांनी डोकेवर काढले आहे. यामुळे पालिकेच्या ( BMC Health Dept ) आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवली आहे.
आजार वाढले - जून महिन्यापासून पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग व कीटक नाशक विभाग यांच्याकडून काळजी घेतली जाते. मुंबईत अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. पावसाला सुरुवात होण्याच्या आधीच जून महिन्याच्या पहिल्या ५ दिवसांत मलेरियाचे ५७, गॅस्ट्रोचे ७८ तर कावीळचे १५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आढळून आलेल्या गॅस्ट्रोच्या रुग्णांपैकी वांद्रे पूर्व-पश्चिम व भायखळ्यात गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून वरळी, प्रभादेवी परिसरात मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत.
रस्त्यावरील पदार्थ खाऊ नये - मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले असताना चिकुनगुनिया व स्वाईन फ्लूचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. पावसाळी आजारांचे रुग्ण आढळून आल्याने पालिका सतर्क झाली आहे. रुग्ण आढळून आलेल्या विभागात औषध फवारणी व धूर फवारणी केली जात आहे. सध्या सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. लोक रस्त्यावरील आणि फुटपाथवर मिळणारे पदार्थ खात आहेत. उघड्यावरील खाऊन नागरिकांना गॅस्ट्रो सारखे आजार होतात. नागरिकांनी बाहेरील /रस्त्यावरील पदार्थ खाऊ नये.असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांनी केले.
१ ते ५ जून पर्यंत रुग्णसंख्या -
- मलेरिया - ५७
- गॅस्ट्रो - ७८
- कावीळ - १५
- डेंग्यू - १०
- लेप्टो - १
हेही वाचा - Cm Uddhav Thackeray : फडवणीस म्हणतात गदाधारी, आम्ही 'गधा' सोडलायं; उद्धव ठाकरेंचा टोला