मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अँजिओग्राफीच्या उपचाराकरिता मुंबईतील खाजगी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Anil Deshmukh Admitted To Jaslok Hospital) आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये (Anil Deshmukh Financial Misappropriation ED Inquiry) त्यांना न्यायालयीन कोठडीत (Anil Deshmukh Court Custody) ठेवण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना वयानुसार अनेक गंभीर आजार असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये अँजिओग्राफीकरिता (Anil Deshmukh Angiography) परवानगी देण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला होता. या अर्जाला मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने परवानगी (Mumbai Sessions Court On Anil Deshmukh) दिली होती. (Anil Deshmukh Jaslok Hospital Treatment)
तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास : अनिल देशमुख यांना आज दुपारी तीनच्या सुमारास आर्थर रोड जेलमधून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्यावर 2 दिवस त्यांच्या पूर्ण तपासण्या केल्या जाणार आहे. अनिल देशमुख यांना बीपी आणि शुगरचा त्रास असल्याने या संदर्भात देखील टेस्ट करण्यात येणार आहे. यानंतर अँजिओग्राफीवरील टेस्ट करण्यात येणार आहे. जर अँजिओग्राफीत ब्लॉकेज निघाले तर पुढील निर्णय होऊ शकते. आवश्यकतेनुसार अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा निर्णय डॉक्टर घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी - अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या आरोपानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. तरीदेखील अनिल देशमुख यांना तुरुंगातच राहावे लागत आहे. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अद्यापही जामीन न मिळाल्याने त्यांना जामीन मिळवून देखील सुद्धा न्यायालयीन कोठडीत राहावं लागत आहे. सीबीआय प्रकरणाचा अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर 18 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.