ETV Bharat / city

भांडुपमध्ये कपड्यांच्या गोदामाला आग; जीवितहानी नाही

भांडूप येथील सोनापूर - एलबीएस मार्गावर असलेल्या अंजली कुमार इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यात या इंडस्ट्रीयल इस्टेटमधील ४ जीन्सची गोदामे जळून खाक झाली आहेत.

fire
भांडुपमध्ये कपड्यांच्या गोदामाला आग
author img

By

Published : Jan 29, 2021, 1:17 AM IST

Updated : Jan 29, 2021, 1:46 AM IST

मुंबई - भांडूप येथील सोनापूर - एलबीएस मार्गावर असलेल्या अंजली कुमार इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यात या इंडस्ट्रीयल इस्टेटमधील ४ जीन्सची गोदामे जळून खाक झाली आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भांडुपमध्ये कपड्यांच्या गोदामाला आग

हेही वाचा - पाचव्या सत्रातही घसरण; शेअर बाजार गुंतवणूकदारांचे ९.५६ लाख कोटी पाण्यात!

दरम्यान, गोदामाला आग लागली त्यावेळी ५० कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते. परंतु, हे सर्वजण वेळीच गोदामांच्या बाहेर पडल्यामुळे कुठलीही जीवितहानी या आगीत झाली नाही. मात्र, आगीत गोदाम जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या आठ फायर इंजिन, चार जम्बो वॉटर टँकर तसेच दोन वॉटर टँकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jan 29, 2021, 1:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.