ETV Bharat / city

सावधान! हापूसच्या नावाखाली होतेय कर्नाटकी आंब्याची विक्री, असा ओळखा हपूस आंबा - mango

कर्नाटकी आंब्याचा दर हापूस आंब्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. याचाच फायदा घेत जास्त नफा कमवण्यासाठी काही विक्रेते हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत आहेत.

हापूस
author img

By

Published : Apr 17, 2019, 9:43 PM IST

मुंबई - कोकणातील प्रसिद्ध असलेला हापूस आंब्याच्या सिझन मे महिन्यात सुरू होतो. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हा चवदार आंबा खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण आता हापूस आंब्यासारखाच हुभेहुब दिसणारा कर्नाटकी आंबाही बाजारात आल्याने हापूस आंबा कसा ओळखायचा, हा प्रश्न आंबाप्रेमीसमोर उपस्थित झाला आहे. यामुळे हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास फसवणूक होत आहे.

कर्नाटकी आंब्याचा दर हापूस आंब्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. याचाच फायदा घेत जास्त नफा कमवण्यासाठी काही विक्रेते हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत आहेत. हापूस आंबा कसा ओळखावा हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतने तयार केलेला विशेष रिपोर्ट.

आंबे विक्रेते नागेश मयेकर यांच्यासबोत ईटिव्हीचे प्रतिनिधी

आज मोठ्या प्रमाणावर मुंबई शहरात जागोजागी हापूस आंबे विक्रेत्यांची रेलचेल दिसत आहे. परंतु, हापूस आंब्याच्या स्पर्धेत कर्नाटकी आंबा उतरल्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीत घट होताना दिसत आहे. हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत असल्यामुळे आमचे उत्पन्न घटले आहे. यामुळे कोकणातील बागायतदारांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे.

कोकण हापूसच्या एका डझनाची घाऊक बाजारातील किंमत ५०० ते ८०० रुपये; तर किरकोळ बाजारात ९०० ते १२०० रुपये आहे. कर्नाटकी आंबा प्रतिडझन किंमत २०० ते २५० रुपये; तर किरकोळ बाजारातील किंमत ३०० ते ३५० रुपये आहे. मात्र, अनेक किरकोळ विक्रेत्यांकडून कर्नाटकी आंबा हापूसच्या किमतीमध्ये विकण्याचा प्रकार घडत आहेत. हापूस आंबा कापल्यावर केशरी पिवळसर दिसतो आणि चवीला गोड असतो. देठाकडे सुगंध येतो. आंबा तयार झाल्यावर सुरकुत्या पडतात. साल पातळ असते. कर्नाटकी आंबा कापल्यावर पिवळा दिसतो. चवीला आंबट-गोड असतो. देठाकडे सुगंध येत नाही. साल जाड असते. यामुळे ग्राहकांनी आंबा विकत घेताना तो योग्य बागायतदाराकडून अथवा विक्रेत्याकडूनच विकत घ्यावा, असे आंबा विक्रेते नागेश मयेकर यांनी सांगितले.

Intro:मे महिना सुरू झाला कोकणातील प्रसिद्ध असलेला  हापूस आंब्याच्या सिझन सुरू होतो. लहानग्यापासून वृद्धापर्यत कोणालाही हा चवदार आंबा खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण आता हापूस आंब्यासारखा हुभेहुब दिसणारा कर्नाटकी आंबा ही बाजारात आल्याने हापूस आंबा कसा ओळखल्याचा हा प्रश्न आता आंबाप्रेमीसमोर उपस्थित झाला आहे. यामुळे हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत आहे.

 कर्नाटकी आंब्याचा दरही हापूस आंब्याच्या तुलनेत कमी खूपच कमी आहे. याचाच फायदा घेत जास्त नफा कमवण्यासाठी काही विक्रते हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत आहेत. हापूस आंबा कसा ओळखावा हे जाणून घेण्यासाठी इ टीव्ही भारत तयार केलेला विशेष रिपोर्ट

Body:आज मोठ्या प्रमाणावर मुंबई शहरात जागोजागी हापूस आंबे विक्रेत्यांची  रेलचेल दिसत आहे.  परंतु हापूस आंब्याच्या स्पर्धेत कर्नाटकी आंबा उरल्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीत घट होताना दिसत आहे.

हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत असल्यामुळे आमचे उत्पन्न घटले आहे. यामुळे कोकणातील बागयदाराचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. 

कोकण हापूसच्या एका डझनाची घाऊक बाजारातील किंमत ५०० ते ८०० रुपये; तर किरकोळ बाजारात

९०० ते १२०० रुपये आहे. कर्नाटकी आंबा प्रतिडझन किंमत २०० ते २५० रुपये;तर किरकोळ बाजारातील किंमत३०० ते ३५० रुपये आहे. मात्र, अनेक किरकोळ विक्रेत्यांकडून कर्नाटक आंबा कोकण हापूसच्या किमतीमध्ये विकण्याचे प्रकार घडत आहेत. हापूस आंबा कापल्यावर केशरी पिवळसर दिसतो आणि चवीला गोड असतो. देठाकडे सुगंध येतो. आंबा तयार झाल्यावर सुरकुत्या पडतात. साल पातळ असते. कर्नाटकी आंबा कापल्यावर पिवळा दिसतो. चवीला आंबट-गोड असतो. देठाकडे सुगंध येत नाही. साल जाड असते. यामुळे ग्राहकांनी आंबा विकत घेताना तो योग्य बागयदाराकडून विकत घ्यावा असे आंबा विक्रेते नागेश मयेकर यांनी सांगितलं.

नोट

आंबे विक्रेते नागेश मयेकर याच्यासबोत 121

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.