आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- अहमदाबादेत गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जल जीवन मिशनच्या लाभार्थ्यांशी साधणार संवादअंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस : राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री की जयंती
- आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस - माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती
- IPL सामना :
1 - मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल
2 - राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज
कालच्या महत्वाच्या बातम्या -
महाराष्ट्रात कधीही निवडणूका लागू शकतात; आशिष शेलार यांचं खळबळजनक विधान
महाविकास आघाडीच्या नेत्यांची विसंगती पाहता महाराष्ट्रात केव्हाही निवडणूका लागू शकतात, असे भाकीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. ते मावळ येथे भाजपाच्या स्थानिक मेळाव्यात बोलत होते. काँग्रेस पक्ष घोटाळेबाज, राष्ट्रवादी झोलबाज आणि शिवसेना दगाबाज असल्याची देखील जहरी टीका त्यांनी याठिकाणी केली.
निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर सचिवांच्या बैठकीतही तोडगा नाही; बेमुदत संप सुरुच
निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या अर्थ तसेच आरोग्य सचिव यांच्यासोबत मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र त्यातून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मार्ड प्रतिनिधींनी सांगितले.
भ्रष्टाचार प्रकरणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा - किरीट सोमैय्यांची राज्यपालांकडे मागणी
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर एकामागून एक आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख परिवहन मंत्री अनिल परब खासदार भावना गवळी यांच्यावर चौकशीच्या फेऱ्यातदेखील सुरू झाल्या आहेत. या सर्व नेत्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमैय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
IPL 2021 : पंजाबचा कोलकातावर पाच गडी राखून विजय; शाहरूख खानची तडाखेबाज फलंदाजी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पर्धा 2021 मधील 45 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द पंजाब किंग्ज यांच्यात झाला. दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा होता. पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने 166 धावांचे लक्ष्य पंजाबसमोर ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबने पाच गडी राखून सामना आपल्या नावावर केला.
खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे
पर्यटकांकरिता आनंदाची बातमी आहे. रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता खुली होणार आहे. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी अशी ओळख असलेली रामोजी फिल्म सिटी 2 हजार एकरांमध्ये आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना, परिपूर्ण हॉलिडे पॅकेज आणि विश्रांतीची ठिकाणे (leisure destination) असल्याने येथील सहल ही आनंदी आणि सुरक्षित असण्याची खात्री देते.