मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर मालदीव आणि दुबईला गेले होते, असा आरोप केला आहे. या आरोपांबाबत ईटीव्ही भारतने समीर वानखेडे यांच्याशी खास संवाद साधला आहे.
अधिकृत परवानगी घेऊन गेलो
समीर वानखेडे म्हणाले, मी ड्रग्जवर कारवाई केली आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. मी मालदीवला गेलो होतो पण माझ्या कुटुंबासह आणि मुलांबरोबर फिरायला गेलो होतो. अधिकृत परवानगी मिळाल्यावर मी गेलो होतो, असेही समीर वानखेडे म्हणाले. दरम्यान, समीर वानखेडे यांच्याशी अनन्या पांडेबाबत आमच्या प्रतिनिधीनी प्रश्न विचारला असता यावर समीर वानखेडे यांनी बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा - समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही - नवाब मलिक