ETV Bharat / city

शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीचा समन्स

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागने जाधव यांच्या घरी धाड टाकत करोडो रुपये जप्त केले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते यशवंत जाधव
शिवसेना नेते यशवंत जाधव
author img

By

Published : May 25, 2022, 12:20 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागने जाधव यांच्या घरी धाड टाकत करोडो रुपये जप्त केले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या छाप्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने यशवंत जाधव यांना समन्स बजावला आहे. त्यामुळं यशवंत जाधव यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान ईडीकडून फेमा कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. यशवंत जाधव यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांनी केलेली पैसाची गुंतवणूक कशाच्या माध्यमातून केली याची चौकशी होण्याची शक्यता आहे. कंपनी व्यवहार मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने त्यांच्या बेनामी कंपनीची चौकशी केली असता काही मोठी रक्कम त्यांच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. ही कशी केली होती याची चौकशी ईडी करणार आहे. आयकर विभागानेही याबाबत यशवंत जाधव यांच्याकडून खुलासा मागितला आहे. त्यामुळं जाधव आता आयकर विभागासह ईडीच्या फेऱ्यात सुद्धा अडकणार आहेत.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे तसेच, यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही किरीट सोमय्यांनी जाधवांवर केला आहे. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. जाधव यांची अनेक बेनामी संपत्ती जप्त केली होती. जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता, भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आता ईडीकडून समन्स बजवण्यात आल्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा - लोणावळ्यातील जंगलात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह; 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.