मुंबई - महाविकास आघाडीच्या पुन्हा एका मंत्र्याला ईडीचे समन्स बजावले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स बजावले आहे. यात त्यांनी बुधवारी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. मागील महिन्यात अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. साई रेस्टॉरंट प्रकरणात अनिल परब यांची चौकशी यापूर्वी चौकशी केली होती. बुधवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश समन्स द्वारे देण्यात आले आहे.
अनिल परबाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष - एकीकडे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीत सध्या शिवसेनेचे नेते व्यस्त आहे. अशातच शिवसेनेच्या गोटातलं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना नेते आणि परिहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. तसेच बुधवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे ईडीसमोर चौकशीला हजर राहणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने परबांच्या मुंबईतील घरावर कार्यालयावर आणि रत्नागिरीतील रिसॉर्टवर तसेच परबांच्या निकटवर्तीयांवर धाडसत्र राबवले होते. त्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामपंयातीकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती.
यापूर्वी झाली होती चौकशी - महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी आज (दि. 26 मे) ईडीने छापेमारी केली होती. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरी छापेमारी अनिल परब यांची मुंबईतील शासकीय बंगला येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीचा अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती. त्या अधिकाऱ्यानेच अनिल परब यांची चौकशी केली होती. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरातून गेले होते. त्यानंतर पून्हा आज त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
'या' सात ठिकाणी झाली होती छापेमारी - 1) अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ 2) मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व 3) दापोलीतील साई रिसॉर्ट. 4) दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी. 5) दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय 6) शेट्टी बिल्डर, गोवंडी 7) अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचे छापे.
काय आहे प्रकरण? - अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचे रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. यापूर्वी किरीट सोमैया यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता. या सोबत अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातही परब यांचा पाय खोलात गेला आहे. तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा - मनी लाँडरिंग प्रकरणी छापेमारी सुरू असलेले कोण आहेत अनिल परब, राजकीय प्रवास