मुंबई कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ईडी सरकार ED government लवकरच 'रनआउट' होईल, असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमुख्य प्रवक्ते महेश तपासे ncp chief spokesperson Mahesh Tapase यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना, अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी 'बुलेट ट्रेन' चा निर्णय तत्परतेने घेतात, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही. असा ट्रॅक रेकॉर्ड ईडीसरकारचा आहे, असेही महेश तपासे म्हणाले. maharashtra politics
ईडी सरकार लवकरच 'रनआउट' होईल एकीकडे सरकारच्या संविधानिकतेबाबतचा न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर 'सी वोटर' चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्वे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे. म्हणून कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेल्या शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असेही महेश तपासे Mahesh Tapase taunts to CM Eknath Shinde म्हणाले. ED government will run out soon ncp chief spokesperson Mahesh Tapase taunts to CM Eknath Shinde
हेही वाचा Gram Panchayat Election : भाजप खासदारांना धक्का, रोहित पाटलांनी ग्रामपंचायतवर फडकवला झेंडा