मुंबई - मुंबईची जीवन वाहिनी म्हणून लोकल सेवेकडे पाहिले जाते. रोज लाखो मुंबईकर आपले कार्यालय गाठण्यासाठी लोकलचा प्रवास करतात. लोकल पकडण्यासाठी हे सर्व मुंबईकर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जात असतात. मात्र, कुर्ल्यामध्ये एक ऑटो रिक्षा चक्क प्लॅटफॉर्मवर धावताना पाहायला मिळाली. ही घटना १२ ऑक्टोबरच्या रात्रीची असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात हजर केले आहे.
त्याचा व्हिडिओही तयार केला - रात्री जवळपास १ वाजताच्या दरम्यान कुर्ला स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक रिक्षा चालकाने थेट आपली रिक्षाचा आणली. प्लॅटफॉर्मवर रिक्षा पाहतात प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांची भांबेरी उडाली. अचानक ही रिक्षा प्लॅटफॉर्मवर आली कशी? असा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना पडला. काही प्रवाशांनी या रिक्षा चालकाला नंतर हटकवले. मात्र, चुकून आपली रिक्षा प्लॅटफॉर्मर आली असल्याचे रिक्षा चालकाने सांगितले. रिक्षा चालकाने थेट प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आणल्याने काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओही तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकल्यानंतर आता कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या रिक्षाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आरपीएफ कडून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल - कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्मवर रिक्षा फिरत असलेल्या चा व्हिडिओ प्रचंड वायरल झाल्यानंतर आरपीएफनेदेखील संबंधित रिक्षाचा तपास सुरू केला. रिक्षा आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. CR नंबर 1305/22 U/S 159 RA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असल्याची माहिती कुर्ला आरपीएफ कडून देण्यात आली आहे.