ETV Bharat / city

दारूच्या दुकानांवरील देवी देवतांची नावे काढून टाका; भाजपची पालिकेकडे मागणी - देवी देवतांची नावे

दारूच्या दुकानांना देवी देवतांचे नाव दिले असल्यास ते काढून टाकावे व त्याबाबात धोरण बनवावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

bmc
बीएमसी
author img

By

Published : Feb 7, 2020, 9:13 PM IST

मुंबई - देवी देवता हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्यांना पुजले जाते अशा देवी देवतांची नावे मुंबईमधील दुकानांना दिली जातात. त्याचप्रमाणे अशी देवी देवतांची नावे दारूची दुकाने, बिअर बार, वाईन शॉप यांनाही दिली जातात. दारूच्या दुकानांना अशी देवी देवतांची नावे दिल्याने श्रद्धेला तडा जातो. यामुळे दारूच्या दुकानांना देवी देवतांचे नाव दिले असल्यास ते काढून टाकावे व त्याबाबात धोरण बनवावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. सदर ठरावाची सूचना लवकरच पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर केली जाणार आहे.

दारूच्या दुकानांवरील देवी देवतांची नावे काढून टाका; भाजपची पालिकेकडे मागणी

हेही वाचा - पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

मुंबईत अनेक रेस्टॉरंट, बार, पब, ऑर्केस्ट्रा, डिस्को यांना देवी देवतांची नावे दिलेली दिसतात. प्रत्येक धर्मात देवी देवतांची पूजा केली जाते. देवांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात श्रद्धा असते. अशा प्रकारे रेस्टॉरंट, बार, पब, ऑर्केस्ट्रा, डिस्को यांना देवी देवतांची नावे दिल्यास भक्तांच्या श्रद्धेला तडा जाऊ शकतो, वादही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेस्टोरंट, बार, पब, ऑर्केस्ट्रा, डिस्को यांना देवी देवतांची नावे देण्याची प्रथा बंद करण्यासाठी दुकाने आणि आस्थापना कायद्यात बदल करावेत. तसेच अशी नावे देणाऱ्या दुकानांवरील नाम फलके पालिकेने काढून टाकावीत अशी मागणी यादव यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेकडून दुकाने आणि आस्थापनांना परवाना दिला जातो. परवाने देताना दुकानांचा आणि व्यावसायिक जागेचा नाम फलक किती मोठा असावा, तो कोणत्या भाषेत असावा, त्यावर मराठी भाषेचा किती वापर करावा, आदी नियमानुसार परवाने दिले जाते. मराठी भाषेचा मुद्दा न्यायालयात असला तरी दुकानांवरील नाम फलकांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला आहे. या अधिकाराचा वापर करून पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.

Intro:मुंबई - देवी देवता हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्यांना पुजले जात अशा देवी देवतांची नावे मुंबईमधील दुकानांना दिली जातात. त्याच प्रमाणे अशी देवी देवतांची नावे दारूची दुकाने, बिअर बार, वाईन शॉप यांनाही दिली जातात. दारूच्या दुकानांना अशी देवी देवतांची नावे दिल्याने श्रद्धेला तडा जातो. यामुळे दारूच्या दुकानांना देवी देवतांचे नाव दिले असल्यास ते काढून टाकावे व त्याबाबात धोरण बनवावे अशी मागणी भाजपाचे नगरसेवक पंकज यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. सदर ठरावाची सूचना लवकरच पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर केली जाणार आहे. Body:मुंबईत अनेक रेस्टोरंट, बार, पब, ऑर्केस्ट्रा, डिस्को यांना देवी देवतांची नावे दिलेली दिसतात. प्रत्येक धर्मात देवी देवतांची पूजा केली जाते. देवांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात श्रद्धा असते. अश्या प्रकारे रेस्टोरंट, बार, पब, ऑर्केस्ट्रा, डिस्को यांना देवी देवतांची नावे दिल्यास भक्तांच्या श्रद्धेला तडा जाऊ शकतो, वादही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेस्टोरंट, बार, पब, ऑर्केस्ट्रा, डिस्को यांना देवी देवतांची नावे देण्याची प्रथा बंद करण्यासाठी दुकाने आणि आस्थापना कायद्यात बदल करावेत. तसेच अशी नावे देणाऱ्या दुकानावरील नाम फलक पालिकेने काढून टाकावा अशी मागणी यादव यांनी ठरावाच्या सुचने द्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेकडून दुकाने आणि आस्थापना लायसन्स दिले जाते. हे लायसन्स देताना दुकानांचा आणि व्यावसायिक जागेचा नाम फलक किती मोठा असावा, तो कोणत्या भाषेत असावा, त्यावर मराठी भाषेचा किती वापर करावा आदी नियमानुसार लायसन्स दिले जाते. मराठी भाषेचा मुद्दा न्यायालयात असला तरी दुकानांवरील नाम फलकांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला आहे. या अधिकारचा वापर करून पालिकेने कारवाई अकरावी अशी मागणी यादव यांनी केली आहे.

बातमीसाठी नगरसेवक पंकज यादव यांनी दिलेल्या ठरावाच्या सूचनेची प्रत / त्यांचा फोटो / PKG Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.