ETV Bharat / city

Nawab Malik-Samee Wankhede Dispute : समीर वानखेडे जन्मापासून मुस्लीम, मलिकांच्या वकिलाचे न्यायालयात शपथपत्र

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhkede) हे जन्मापासून मुस्लिम असल्याचे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या वकिलांनी हे शपथपत्र न्यायालयात दाखल केले आहे. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर वानखेडे यांच्या धर्मावरुन वाद निर्माण झाला आहे. समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा दाखला मिळवून केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली असून ते धर्माने मुस्लिम असल्याचा दावा मलिकांनी केला होता. वानखेडे यांनी एक मागासवर्गीय उमेदवाराचा हक्क बळकावल्याचा आरोप मलिकांनी केला होता. (Nawab Malik Allegations over Sameer Wankhede)

Dnyandev Wankhede is Muslim
समीर वानखेडे
author img

By

Published : Nov 17, 2021, 1:10 PM IST

Updated : Nov 17, 2021, 7:39 PM IST

मुंबई - एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhkede) हे जन्मापासून मुस्लीम असल्याचे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिकांच्या वकिलांनी (Minister Nawab Malik's Advocate) हे शपथपत्र उच्च न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणावर गुरूवारी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी होणार आहे. यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्री नवाब मलिकांचा आरोप काय?

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. त्यानंतर वानखेडे यांच्या धर्मावरुन वाद निर्माण झाला आहे. समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा दाखला मिळवून केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली असून ते धर्माने मुस्लीम असल्याचा दावा मलिकांनी केला होता. वानखेडे यांनी एका मागासवर्गीय उमेदवाराचा हक्क बळकावल्याचा आरोप मलिकांनी केला होता. (Nawab Malik Allegations over Sameer Wankhede) या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान मुंबई महापालिकेने समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचे शपथपत्र दाखल केले आहे. यामुळे वानखेडे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट -

एनसीबीचे (ncb) विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मंगळवारी मुंबईचे पोलीस आयुक्त (mumbai police commissioner) हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये सुमारे 35 मिनिटे बैठक झाले समीर वानखेडे यांना जात वैधता प्रमाणपत्राशी संबंधित चौकशीसंदर्भात बोलावण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) क्रूझ ड्रग्स (cruise drug case) प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर आणखी एक टीम वानखेडे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही ड्रग्स (Drugs) प्रकरणासंदर्भात अनेक गोष्टींचा संदर्भ देत वानखेडेवर खंडणीचा आरोप केला आहे. तसेच वानखेडे यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मात्र, वानखेडे यांना अनुसूचित जातीच्या कोट्यातून सरकारी नोकरी मिळाली जी मुस्लीम व्यक्तीला मिळू शकत नाही. ही फसवणूक आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

Last Updated : Nov 17, 2021, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.