मुंबई - अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे लस देण्यावरून भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादानंतर भाजपा आमदार भारती लव्हेकर, नगरसेविका रंजना पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते जोगेश्वरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात पोहचले. या सर्वांचे म्हणणे आहे, की त्यांना शिवसेनेच्या नगरसेविका रंजना पटेल, हारुन खान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील लसीकरण केंद्रावर येऊन जबर मारहाण केली.
या प्रकरणी, ज्या कोणी धक्का बुक्की आणि शिवीगाळ केली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी भारती लव्हेकरांनी केली आहे. दोन्ही पक्षाच्या बाजू समजून घेण्यात आल्या असून ज्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे सहायक पोलीस आयुक्तांनी सांगितले.