ETV Bharat / city

Fadnavis Vs MVA Government : 'ठाकरे सरकार विद्यापीठांना युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र रचतंय'

जेवढ्या नेमणुका महाविकास आघाडी सरकारने केल्या तिथे तिथे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यापीठे (Universities) युवासेनेचे अड्डे (Yuvasena) बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 6, 2022, 2:38 AM IST

मुंबई - राज्यात सध्या सरकार नाही, तर टोळीचे राज्य आहे. इतिहासातील सर्वात पळपुटे, डरपोक आणि खंडणीखोर असे हे सरकार आहे. या सरकारमध्ये विकास कामांसाठी कुणी भांडत नाही, तर टक्केवारीसाठी भांडतात, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) युवासेनेचे (Yuvasena) अड्डे बनवण्याचे षडयंत्र करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत अनेक आरोपही केले आहेत.

  • कायदा मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू -

राज्य सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैध पद्धतीने मंजूर केले. हे विधेयक पास करणारे, काळ्या रात्री काळी कृत्ये करणारे हे लोकं आहेत. हा कायदा मागे घेतला नाही तर यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

  • महाविकास आघाडी सरकारचा कारभार भ्रष्टाचारयुक्त -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले होते. मी तमिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरूंच्या निवडीसाठी १० कोटी घेतले जात. भाजप सरकारच्या कार्यकाळात आम्ही केलेला विद्यापीठ कायदा जसाच्या तसा तामिळनाडू सरकारने लागू केला. मात्र, आता तोच कायदा बदलला असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुलगुरू पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा आरोपसुद्धा फडणवीस यांनी केला.

  • विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू -

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, जेवढ्या नेमणुका महाविकास आघाडी सरकारने केल्या तिथे तिथे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षडयंत्र आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ज्यावेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, ती राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात?, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या विचारतील. एकीकडे मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार भ्रष्टाचारयुक्त कारभार करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.