ETV Bharat / city

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक? जाणून घ्या 'एक्सपर्ट अ‌ॅडव्हाइस'

author img

By

Published : Jul 2, 2020, 4:49 PM IST

देशाची अखंडता, सायबर सुरक्षितता, व्यक्ती स्वांतत्र्य तसेच सायबर डेटा चोरी याबाबत कडक पावले उचलत मोदी सरकारने सोमवारी चायनीज अ‌ॅपवर बंदी आणली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संबंधित निर्णयाची घोषणा केली. याला भारत-चीन सीमावादाची पार्श्वभूमी आहे.

cyber crime in india
भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक? जाणून घ्या 'एक्सपर्ट अॅडव्हाइस'

मुंबई - देशाची अखंडता, सायबर सुरक्षीतता, व्यक्ती स्वांतत्र्य तसेच सायबर डेटा चोरी याबाबत कडक पावले उचलत मोदी सरकारने सोमवारी चायनीज अ‌ॅपवर बंदी आणली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संबंधित निर्णयाची घोषणा केली. याला भारत-चीन सीमावादाची पार्श्वभूमी आहे. याबाबत तज्ज्ञाचे मत जाणून घेऊया...

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक? जाणून घ्या 'एक्सपर्ट अ‌ॅडव्हाइस'

बंद करण्यात आलेल्या अ‌ॅप्समध्ये टिकटॉक आणि 'व्ही-चॅट'सह 59 अ‌ॅप्सचा समावेश आहे. संबंधित अ‌ॅप्स फोनवरून संवेदनशील माहिती त्यांच्या सर्व्हरवर हस्तांतरित करतात. याचा अयोग्य वापर होऊ शकतो. यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या होत्या. अनेकांचा वैयक्तिक डेटा चोरल्याचे देखील समोर आले. काही प्रकरणांमध्ये, गोपनीयतेचा करार मोडल्याचे उघडकीस आले आहे. या अ‍ॅप्समध्ये काही अतिशय लोकप्रिय अ‌ॅप्सचा समावेश आहे. टिक-टॉक, कॅमस्कॅनर आणि यूसी ब्राउझरचा समावेश आहे. टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि शेअर-इट या अ‌ॅप्सचा देशातील मुख्य आर्थिक घडामोडींमध्ये मोठा वाटा आहे. भारतातील अनेक नागरिक या कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न देखील सरकारला सोडवावा लागणार आहे.

दुसरीकडे गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या अहवालाच्या आधारेच सरकारने संबंधित कारवाई केल्याचे सांगितले. या अ‍ॅप्सला यापूर्वी अशा प्रकारचा इशारा अनेक वेळा देण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले.

हे प्रकरण अनेक वेळा संसदेत उपस्थित करण्यात आले. त्याचबरोबर अनेक तज्ज्ञांनी या अ‌ॅप्समधून फोन धारकांची माहिती देखील मिळवल्याचे समोर आले आहे. अ‌ॅप युजर्सची वेगवेगळ्या प्रकारची संवेदनशील माहिती सर्व्हरला ट्रान्समिट केल्याचे तज्ज्ञ सांगतात.

या सर्व व्यतिरिक्त आपण इतर कोणतेही ब्राउझर किंवा अ‍ॅप वापरत असाल तर ती माहिती सर्व्हरपर्यंत देखील पोहोचू शकते. यामुळे सर्व्हरद्वारे मोबाइल बँकिंगचा वापर करून युसर नेम आणि पासवर्ड यांसारख्या माहितीची चोरी होऊ शकते. यामुळे फोनधारकाची सुरक्षितता धोक्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.