मुंबई - दिवाळी हा रोषणाईचा उत्सव आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये पणत्या खरेदी करण्याची लगबग सुरू होते. विक्रोळीच्या नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस या संस्थेमध्ये आकर्षक पणत्या बनविल्या जात आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गतिमंद आणि दिव्यांगाना पणत्या बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराचं साधन दिले जात आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
यंदा पणत्यांना चांगली मागणी
जवळ जवळ 7 लाखांहून अधिक पणत्या रंगरंगोटीसह त्यांची पॅकिंग पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून या पणत्या बनवल्या जात आहे. या पणत्याची विक्री ऑनलाईन केली जाते. दिव्यांगांना स्वतंत्र रोजगार मिळावा, त्यांनी स्वावलंबी बनावे व आपली कला अवगत ठेवावी या दृष्टीने नेडा ( नॅशनल असोसीएशन ऑफ डिसेंबल्ड ) या संस्थेतून वर्षभर विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी आम्ही विविध कालाकुसरीच्या वस्तू बनवून त्या विक्री करतो. लॉकडाऊन आधी आम्ही या वस्तू सिद्धिविनायक मंदिर , महालक्ष्मी मंदिर , हिरानंदानी सारख्या ठिकाणी आम्ही विक्री करायचो. सध्या ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. या मातीच्या पणत्या असून त्या रंगरंगोटी व पॅकिंग करण्याचे काम येथे होते. पावसाळ्यात आम्ही छत्र्या बनवतो. तसेच सेफ्टी पिन तर दिवाळीत पणत्या अशी विविध काम केले जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकारी विक्रम मोरे यांनी सांगितले.
हेही वाचा - रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी गिरीश महाजनांना फसवले, राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील यांचा घणाघात