मुंबई - सिग्नल बिघाड, रुळाला तडे, मेगाब्लॉक अशा विविध कारणांमुळे लोकल ट्रेन विस्कळीत होत असतानाच आज (गुरुवार) पहाटेपासून लोकल सेवा धुक्यात अडकून पडली. दाट धुक्याचा सर्वाधिक फटका रेल्वे सेवाला बसला आहे. आज सकाळीपासून मध्य-पश्चिम-हार्बर मार्गावरील लोकल सेवा 30 ते 40 मिनीटांनी उशिराने धावत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.
लोकल सेवेला फटका-
मुंबई आणि उपनगरात मध्य रात्रीपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यापुढे लोकलच्या प्रखर दिव्यांचाही नाईलाज झाला होता. त्यामुळे पहाटेपासूनच लोकल धिम्यागतीने सुरू होत्या. सकाळी आठ वाजेपर्यंत धुके राहिल्याने लोकल सुमारे 30 ते 40 मिनीटांनी उशिराने धावत होत्या. तर मध्य रेल्वेवर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, पनवेल, बेलापूर, ऐरोली सह सीएसटीपर्यंत धुके पसरले होते. या धुक्यामुळे काही अंतरावरचे देखील दिसत नसल्याने मोटरमनना गाड्या हळू चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळी आठ-साडेआठ पर्यंत धुक्यामुळे प्रवाशांची पंचाईत झाली.
प्रवाशांना लेट मार्क-
मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत. मुंबईत सर्वत्र फॉगी वातावरण असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह देखील पाहायला मिळत आहे. मात्र, आज सकाळीपासून दाट धुक्यामुळे मध्य-पश्चिम-हार्बर मार्गावरील लोकल सेवा 30 ते 40 मिनीटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. याशिवाय अनेक लोकल प्रवाशाना लेट मार्क लागला आहे.
दाट धुक्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने - मुंबई लोकल लेट मार्क
मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाणारी मुंबई लोकल गुरुवारी सकाळी धुक्यात अडकली आणि चाकरमानी मंडळींना स्टेशनवर ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र दिसत होते. मुंबई आणि उपनगरात मध्य रात्रीपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत धुके राहिल्याने लोकल सुमारे 30 ते 40 मिनीटांनी उशिराने धावत होत्या. तर मध्य रेल्वेवर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, पनवेल, बेलापूर, ऐरोली सह सीएसटीपर्यंत धुके पसरले होते.