ETV Bharat / city

Sudhir Mungantiwar : कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात वेगाने मार्ग काढू - सुधीर मुनगंटीवार - various problems faced by artists

कलाकारांना विविध समस्या ( Various problems faced by artists ) भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे प्रतिपादन आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Culture Minister Sudhir Mungantiwar ) यांनी केले.

Alka Kubal
अलका कुबल
author img

By

Published : Sep 19, 2022, 12:18 PM IST

मुंबई - राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या ( Various problems faced by artists ) भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे प्रतिपादन आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Culture Minister Sudhir Mungantiwar ) यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात ( Sahyadri Guest House ) आज ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटे, जब्बार पटेल ( Jabbar Patel ) तसेच अलका कुबल यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार

शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे - यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केळी. या सर्वांनी कलाक्षेत्राच्या विविध समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर बोलतांना मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीने काम करण्यास सांगितले. या सर्व समस्या लवकरच सुटलेल्या दिसतील असेही मुनगंटीवार यांनी या कलाकारांना सांगितले. शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही यावेळी मंत्रीमहोदयांनी सांगितले.

Alka Kubal
अलका कुबल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मिती- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट ( Film production on Rashtrasant Tukdoji Maharaj ) निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याविषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल ( Smt Alka Kubal ) यांच्याशी चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटासंदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण केली. हा चित्रपट माहितीने अचुक होण्यासाठी तसेच दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल असेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढच्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे प्रकाशन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.