मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ४४ हजार १०४ रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे भाव उतरले आहेत.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १९ हजार ४२५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख ४४ हजार १०४ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०९५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ८६ हजार ०१७ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.७८ रुपये इतका आहे.
हेही वाचा : Gold Silver Rates : सोन्याच्या दरात घट तर, चांदीच्या दरामध्ये घसघशीत पाच हजार रुपयांची वाढ.. पहा आजचे दर