ETV Bharat / city

राज्यात लॉकडाऊनच्या काळात 2 लाख 75 हजार गुन्हे तर, 29 कोटी 66 लाख रुपयांची वसूली - महाराष्ट्र पोलीस

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 75 हजार गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 1 हजार 347 वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले आहे. तसेच 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Oct 4, 2020, 5:59 PM IST

मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही समाजकंटक माणसे त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 75 हजार गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 1 हजार 347 वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले आहे. तसेच 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 22 मार्च ते 3 ऑक्टोबरपर्यंतची ही आकडेवारी त्यांनी सांगितली.

राज्यात आतापर्यंत कलम 188 नुसार 2 लाख 75 हजार 990 गुन्हे नोंद झाले असून 39 हजार 39 व्यक्तींना अटक करण्यात आली. शिवाय, 96 हजार 541 वाहने जप्त केली आहेत. विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 66 लाख 18 हजार 532 रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटना देखील घडल्या. अशा 369 घटना घडल्या असून त्यात 898 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 1 लाख 13 हजार 680 कॉल करण्यात आले आणि त्या सर्वांची योग्य दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 225 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 250 पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.