ETV Bharat / city

देशात गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 118 नवे कोरोनाबाधित, 482 जणांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 118 नवे करोनाबाधित आढळले असून, 41 हजार 985 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 482 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 94 लाख 62 हजार 810 वर पोहोचली आहे.

author img

By

Published : Dec 2, 2020, 12:37 AM IST

COVID-19 news from across the nation
देशात गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 118 नवे कोरोनाबाधित

नवी दिली - कोरोनाबाबत दिलासा देणारी बातमी आहे. 11 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत कोरोना रुग्णांच्या टक्केवारीमध्ये घसरण झाली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण 7.15 टक्क्यांवरून 6.69 टक्क्यांवर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही आकडेवारी जाहीर केली. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्लीमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ही देशाला दिलासा देणारी बातमी आहे. 11 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत कोरोना रुग्णांच्या टक्केवारीमध्ये घसरण झाली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण 7.15 टक्क्यांवरून 6.69 टक्क्यांवर आले आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 118 नवे करोनाबाधित आढळले असून, 41 हजार 985 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 482 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 94 लाख 62 हजार 810 वर पोहोचली आहे. सध्या देशात 4 लाख 35 हजार 603 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत एकूण 88 लाख 89 हजार 585 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 1 लाख 37 हजार 621 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 930 जणांना कोरोनाची लागण

गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 4 हजार 930 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 290 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे 95 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 16 लाख 91 हजार 412 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.49 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.58 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.