ETV Bharat / city

कोस्टल रोडच्या कामांमध्ये एक हजार 600 कोटींचा भ्रष्टाचार; आशिष शेलार यांचा आरोप - आशिष शेलार कोस्टल रोड बातमी

अप्रमाणित खाणींकडून माल घेऊन भरावाचे काम करण्यात आले. यामुळे कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा घसरला. असून, याबाबत आपण केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Ashish Shelar latest news
Ashish Shelar latest news
author img

By

Published : Oct 3, 2021, 8:44 AM IST

मुंबई - कोस्टल रोडच्या कामांमध्ये एक हजार 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. अप्रमाणित खाणींकडून माल घेऊन भरावाचे काम करण्यात आले. यामुळे कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा घसरला. असून, याबाबत आपण केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोस्टर रोडच्या कामांमध्ये एक हजार कोटीचा घोटाळा होत असल्याचे पत्र मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आपण 6 सप्टेंबर 2021ला दिले होते. मात्र, हे पत्र दिल्यानंतर लगेच संध्याकाळी तातडीने महापालिकेकडून यावर उत्तर देत, कोस्टल रोडच्या कामांमध्ये कुठलाही गैरव्यवहार नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेकडून देण्यात आले, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. मात्र, महानगरपालिकेकडून घाईगडबडीत देण्यात आलेल्या उत्तरानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कोस्टल रोडच्या कामांमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. कोस्टल रोडच्या कामांमध्ये 1 हजार कोटींचा नव्हे, तर 1 हजार 600 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे 14 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोड मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

अप्रमाणित खाणींकडून भराव -

कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा राखला जावा, यासाठी महानगरपालिकेने कामांचा दर्जा तपासण्यासाठी दोन कंपन्यांची नेमणूक केली. या प्रकल्पाला कायदेशीर पद्धतीने काम करण्यासाठी मुुंबई महापालीकेच्या स्थायी समितीने दोन कंन्सल्टन नियुक्ती केली असून ए.ई. काँम या कंपनीची जनरल कन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. लुईस बर्गर यांना प्रकल्प कंन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन कंपन्यानाला ६०० कोटी रुपये देण्याचे स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेला या दोघांनी सल्लामसलत करून काम योग्य दिशेने होईल, तसेच ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम होईल, यासाठी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या दोन कंन्सल्टनेने कुठल्या दर्जाचा माल भरावासाठी घेण्यात यावा, तसेच कुठल्या खाणीतून हा माल घेण्यात यावा या प्रमाणीत खाणीच्या याद्या देण्यात आल्या. मालाची घनताही ठरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कंन्सल्टनेने ठरवून दिलेल्या खाणीतील माल न घेता तो अन्य खाणीतून निकृष्ठ दर्जाचा माल घेण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्पाला धोका निर्माण झाला असल्याचे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. या अप्रमाणित खाणींकडून जवळपास 28 मेट्रिक टन माल मुंबईच्या समुद्रात भरावासाठी वापरण्यात आल्याने कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा ढासळला आहे. कंत्राटदाराने अप्रमाणीत अशा गवाण ३५६/९ श्री कन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन ४१/१ वैभव कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. ५३ भत्ताद कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. ५४ दिप इंन्फ्रा, कुंडेवाल एस. एन. ५१/ २, कुंडेवाल एस. एन. ५८ या सहा खाणीतून भराव माल घेतला असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी खुलासा मागवावा -

कोस्टल रोडचे काम हे दर्जा सांभाळूनच केले जाईल, असे आश्वासन मुंबई महानगरपालिकेकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणीस यांच्या प्रयत्नाने केंद्रातून सर्व परवानग्या कोस्टल रोडसाठी आणण्यात आल्या. मात्र, सध्या ज्याप्रमाणे कोस्टल रोडच्या कामांमध्ये दर्जा राखला जात नाही. याबाबत आपण केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोस्टल रोडच्या कामाबाबत पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच कोस्टल रोड तयार करत असताना ज्या नियम व अटी शर्ती महानगरपालिकेकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्या अटी शर्तींच्या मर्यादेत महानगरपालिका कोस्टल रोडचे काम करते आहे का? याबाबत खुलासा मागवावा अशीही विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोस्टर रोडला आमचा विरोध नसून होणार्‍या कामांचा दर्जा राखला जावा, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे स्पष्टीकरणही आशिष शेलार यांच्याकडून देण्यात आले.

'मुख्यमंत्र्यांनी एसआयटीचे गठण करावे' -

अप्रमाणित सहा खाणींकडून माल घेऊन कोस्टर रोडसाठी भराव करण्यात येत आहे. यामुळे जनतेचे 1600 कोटी रुपयांचे नुकसान होते आहे. तसेच कोस्टल रोडच्या कामांमध्ये दर्जा राखला जात नाही. कामांचा दर्जा राखावा, यासाठी ज्या दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली. त्या दोन्ही कंपन्यांना तातडीने काळा यादीमध्ये टाकण्यात यावे. तसेच या संपूर्ण प्रकरणासाठी एसआयटी गठीत करावी, अशी मागणी अशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

'आदित्य ठाकरे भ्रष्टाचारावर पांघरूण घालतात' -

कोस्टल रोडच्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी वेळोवेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कामाच्या ठिकाणी भेट देत असतात. मात्र, कोस्टल रोडच्या कामांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना आदित्य ठाकरे कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करतात का, कोस्टल रोडच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण का घालतात असा सवालही आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.

हेही वाचा - आगामी महापालिका निवडणुकीत तीन नगरसेवकांचाच प्रभाग असणार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.