मुंबई भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 7 हजार 591 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत 10 हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्ण Corona patient आढळले आहेत. देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची New Coronavirus Cases नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत रविवारी 84 रुग्णांची घट झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची new cases recorded संख्या जास्त आहे.
-
#COVID19 | India reports 7,591 fresh cases and 9,206 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 84,931
Daily positivity rate 4.58% pic.twitter.com/MIhiMYLtot
">#COVID19 | India reports 7,591 fresh cases and 9,206 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 29, 2022
Active cases 84,931
Daily positivity rate 4.58% pic.twitter.com/MIhiMYLtot#COVID19 | India reports 7,591 fresh cases and 9,206 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 29, 2022
Active cases 84,931
Daily positivity rate 4.58% pic.twitter.com/MIhiMYLtot
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 84 हजार 931 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशात रविवारी दिवसभरात 26 लाख 53 हजार 964 कोविड लसी देण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 4.58 टक्के आहे.
मुंबईत रविवारी ६१० कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत रोज ८ ते १३ हजार दरम्यान चाचण्या केल्या जातात. यामुळे ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या नोंद होत होती. आज रविवारी ६१० रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत रोज १ किंवा दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यात आज वाढ होऊन ४ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४९६९ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1723 कोरोनाच्या Maharashtra Corona Update नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 1845 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात 6 कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,34, 878 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 11743 सक्रिय रुग्ण संख्या आहे.