मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट उग्र रुप धारण करत आहे. रोज सरासरी 60 हजार रुग्णांची राज्यात नव्याने नोंद होत आहेत. असं असलं तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, ही समाधानाची बाब आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीकडे नजर टाकली असता ही बाब आपल्याला जाणवते. 23 एप्रिल रोजी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 74 हजार पार झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाढणारी चिंता ही मात्र कमी झाली आहे. एक नजर टाकूया दहा दिवसात बरे झालेल्या रुग्ण संख्येच्या आकडेवारीवर -
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण -
17 एप्रिल - 56 हजार 783 (कोरोनामुक्त)
17 एप्रिल- 67 हजार 123 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 81.18%
18 एप्रिल- 45 हजार 654 (कोरोनामुक्त)
18 एप्रिल- 68 हजार 631 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 80.92%
19 एप्रिल- 52 हजार 412 (कोरोनामुक्त)
19 एप्रिल- 58 हजार 924 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 81.04%
20 एप्रिल- 54 हजार 224 (कोरोनामुक्त)
20 एप्रिल- 62 हजार 097 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 81.14%
21 एप्रिल- 54 हजार 985 (कोरोनामुक्त)
21 एप्रिल- 67 हजार 468 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 81.15%
22 एप्रिल- 62 हजार 298 (कोरोनामुक्त)
22 एप्रिल- 67 हजार 031 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 81.34%
23 एप्रिल- 74 हजार 045 (कोरोनामुक्त)
23 एप्रिल- 66 हजार 836 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 81.81%
24 एप्रिल- 63 हजार 818 (कोरोनामुक्त)
24 एप्रिल- 67 हजार 160 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 82.02%
25 एप्रिल- 61 हजार 450 (कोरोनामुक्त)
25 एप्रिल- 66 हजार 191 ( नवे रुग्ण)
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- 82.19%
मुंबई, पुणे आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या जरी चिंताजनक असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन सरकारने लावला आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर राज्यातील परिस्थिती काय असेल, हे महत्वाचे ठरेल.