ETV Bharat / city

मेट्रो '2 अ' आणि '7' ला कोरोना महामारीचा फटका! - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

कोरोना महामारीचा मोठा फटका मुंबईतील सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पांना बसला आहे. तसेच 14 जानेवारीला होणारी 'ट्रायल रन' रद्द करत आता ती मार्चमध्ये घेण्याचा निर्णय घेतल्याची, माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटिव्ही भारत'ला दिली आहे.

मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो
author img

By

Published : Dec 28, 2020, 3:04 PM IST

मुंबई - कोरोना महामारीचा मोठा फटका मुंबईतील सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पांना बसला आहे. मेट्रो 2 अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या दोन प्रकल्पालाही याचा फटका बसल्याने प्रकल्प पूर्णत्वाची डेडलाईन सहा महिने पुढे गेली होती. तर आता नव्या डेडलाईनलाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण डिसेंबरमध्ये येणारी मेट्रो गाडी अजून मुंबईत आलेली नसून काही ठिकाणचे बांधकामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता 14 जानेवारीला होणारी 'ट्रायल रन' रद्द करत आता ती मार्चमध्ये घेण्याचा निर्णय घेतल्याची, माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए)एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटिव्ही भारत'ला दिली आहे. तर कोरोनामुळे कामावर परिमाण झाल्याचेही स्पष्ट केले आहे.

डिसेंबर 2020 ची होती डेडलाईन -

उपनगरातील प्रवास सुपरफास्ट करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो 2 अ आणि 7 हे दोन मार्ग हाती घेतले आहेत. या मार्गाचे बांधकाम वेगात सुरू आहे. हे दोन्ही मार्ग डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण करत मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस होता. मात्र मार्चपासून मुंबईत कॊरोना महामारीचा कहर सुरू झाला आणि पायाभूत सुविधा प्रकल्पाचे काम एकतर ठप्प झाले वा संथ झाले. यात मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चा ही समावेश आहे. कोरोनामुळे बांधकाम रखडल्याने डिसेंबर 2020 ची डेडलाईन चुकली. डेडलाइन सहा महिन्यांसाठी पुढे गेली. त्यानुसार मे 2021 मध्ये या दोन्ही मेट्रो धावतील, अशी नवी डेडलाइन जाहीर करण्यात आली.

सप्टेंबरमध्ये केली होती 'ट्रायल रन'ची घोषणा-

मेट्रो 2 अ आणि 7 प्रकल्पाचा आढावा घेत महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी 10 सप्टेंबरला मे 2021 ला मेट्रो 2 अ आणि 7 वाहतूक सेवेत दाखल होईल, असे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. तर यासाठी 14 जानेवारीला ट्रायल रन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. या प्रकल्पासाठी 11 मेट्रो गाड्या बंगळुरूमधून मुंबईत येणार आहेत. यातील पहिली गाडी डिसेंबर अखेरीस तर उर्वरित 10 गाड्या मार्च 2021पर्यंत येतील. पहिली गाडी आल्यास 14 जानेवारीला ट्रायल रन घेण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले होते. पण आता ही ट्रायल रनच रखडली आहे.

गाडीची प्रतीक्षा-

14 जानेवारीला मेट्रो 2 अ आणि 7 च्या ट्रायल रन विषयी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी ट्रायल रन रखडल्याची कबुली दिली आहे. तर ट्रायल रनसाठीची गाडीच अजून आलेली नाही. तर डेपोवरून मेट्रोच्या मुख्य पुलावर येण्यासाठीच्या मार्गाचे कामच अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे 14 जानेवारीला ट्रायल रन घेताच येणार नसल्याने ती रद्द करण्यात आली आहे. तर आता ही ट्रायल रन मार्चमध्ये होणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान आता ट्रायल रन पुढे गेल्याने काम रखडल्याने मे 2021 ची डेडलाइन आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा- 'बायकांच्या पदराआडूनची खेळी, तुमच्यावर उलटणार, आम्ही नोटिसीला घाबरत नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.