ETV Bharat / city

BJP Against Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात वातावरण तापले, शिवडी न्यायालयात भाजपकडून याचिका दाखल - भारतीय जनता पार्टीचे नाना पटोलेंविरोधात आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र यांच्या विषयी आक्षेपाहार्र वक्तव्य केले आहे. त्यानंतर राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन, (BJP agitation against Nana Patole) निषेध मोर्चे करत आहेत. 24 जानेवारी रोजी मुंबई, औरंगाबादसह इतर ठिकाणीही आंदोलने करण्यात आले. तसेच, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांच्या वतीने शिवडी न्यायालयात पटोलेंविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात राज्यभरात आंदोलने

author img

By

Published : Jan 25, 2022, 12:23 AM IST

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांच्या वतीने आज (दि. 24 जानेवारी)रोजी शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. (BJP agitation against Nana Patole) काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपाहार्र वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्याता आल्याचे म्हटले आहे. भाजप युवा (Bjp against Congress State President Nana Patole statement)मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी हा दावा दाखल केला असून या याचिकेवर शिवडी न्यायालयात (दि. 27 जानेवारी)रोजी सुनावणी होणार आहे.

व्हिडिओ

भाजप कार्यकर्त्यांचे राज्यभरात आंदोलन

न्यायालयाने तेजिंदर सिंग तिवाना यांच्या याचिकेवर 28 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान हे देशातील घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणे हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला आहे.

येथील सिडको येथील वसंतराव नाईक चौकात आंदोलन

मुंबईत भाजपतर्फे 18 जानेवारी रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, औरंगाबादमध्येही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडे मरो आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. येथील सिडको येथील वसंतराव नाईक चौकात सोमवार (दि.२४)रोजी हे आंदोलन करण्यात आले.

कार्यकत्यांनी केली जोरदार घोषणाबाजी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी काळामध्ये औरंगाबाद दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा ईशारा भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला. तसेच, नाना पटोले यांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय, महा विकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.

हेही वाचा - बाळासाहेब हयात असतानाच युतीतून बाहेर पडण्याचा शिवसेनेचा विचार होता - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.