ETV Bharat / city

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी घेतला 9 कोटी 99 लाख रोखीचा धसका ; एसटी परिवहन महामंडळाची तातडीची बैठक

author img

By

Published : Oct 7, 2022, 12:12 PM IST

दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केलेल्या सतराशे बससाठी सुमारे दहा कोटी रक्कम एकाच वेळी भरल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धसका घेतला (CM Eknath Shinde took Emergency meeting) आहे. त्यामुळे राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची दुपारी बारा वाजता तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली (Emergency meeting of ST Transport Corporation) आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केलेल्या सतराशे बससाठी सुमारे दहा कोटी रक्कम एकाच वेळी भरल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धसका घेतला (CM Eknath Shinde took Emergency meeting) आहे. त्यामुळे राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची दुपारी बारा वाजता तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले (Emergency meeting of ST Transport Corporation) जाते.

महामंडळाची तातडीची बैठक - बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. गर्दी जमवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आणण्यात आली. त्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बसेस राज्यातून बुक केल्या. या बस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे भरण्यात आली. हा सगळा व्यवहार रोखीत झाला. शिवसेना आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यामुळे शिंदे गटाची धावपळ उडाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी बारा वाजता बैठक सुरू होईल. परिवहन विभावाचे अधिकारी शेखर चन्ने यांच्यासह विविध डेपोचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, एसटी महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ही बैठक बोलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात (Emergency meeting of ST Transport Corporation) आले.

अंबादास दानवेंचा आरोप - शिंदे गटाने आयोजित केलेला दसरा मेळाव्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बस राज्यातून बुक करण्यात आल्या. या बस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे ३ ऑक्टोबरला भरले. या मेळाव्यासाठी १७९५ बसपैकी प्रत्यक्षात १६२५ बसचा वापर झाला. उर्वरित १७० बसच्या भरलेल्या पैशांचा परतावा एसटी कोणाला करणार ? सामान्य व्यक्तीला बँकेत ५० हजारापेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्याला अधिकृत ओळखपत्र सादर करावे लागते. मग इतकी मोठी रक्कम भरताना एसटी महामंडळाने त्याची विचारपूस केली का ? असा सवाल दानवे यांनी एसटी महामंडळाला (ST Transport Corporation) विचारला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.