मुंबई - घाटकोपर पूर्व येथील आमदार आणि माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांच्या 30 वर्षाच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता यांच्या कार्याचे कौतुक करीत भाजपने गेल्या पाच वर्षात केलेल्या मुंबईतील विकासकामांचा पाढा वाचला. भाजपने गेल्या पाच वर्षात मुंबई पुनर्विकास आणि दळणवळण या बाबत भरीव काम केले आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा सरकारने बदलला आहे, असे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा - बँक घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'कडून अजित पवारांवर गुन्हा दाखल; शरद पवारांचे नाव नाही
आमदार प्रकाश मेहता यांना यावेळी युतीबाबत आणि त्यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत विचारला असता सर्वांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. युतीमध्येच आम्ही लढू , युतीचे सरकार यावे हे प्रयत्न सुरू आहेत. परंतु युतीबाबत दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. आपण कोणत्या जबाबदारीत आहोत हा महत्त्वाचा प्रश्न नाही. पक्षाच्या मुळ धारेत काम करीत असताना मला काही अडचण वाटत नाही. कधी कधी राजकारणात असे होते, असे ते म्हणाले.
हेही वाचा - भाजप सरकारचा शिवस्मारकात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप
या वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक आमदार तारासिंग, राम कदम यांच्यसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.