ETV Bharat / city

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाषा ही तुकडे तुकडे गँग सारखी होती - आशिष शेलार - आशिष शेलार ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते. पण ज्यांची दिशा चुकली आहे आणि विचारांची दशा झाली आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

ashish shelar critisize on dasara melava

author img

By

Published : Oct 16, 2021, 8:48 AM IST

मुंबई - खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते. पण ज्यांची दिशा चुकली आहे आणि विचारांची दशा झाली आहे. त्यांचा षण्मुखानंद सभागृहात दशावतार चालू होता आणि या दशावतरामध्ये आमच्या कोकणात एक पांडू असतो, तो पांडू कोण? असा प्रश्न उपस्थित होतो, असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची भाषा ही तुकडे तुकडे गँग सारखी होती, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले आशिष शेलार -

मुख्यमंत्र्यांनी दिशा देऊन महाराष्ट्राला विचारांचे सोने देणे अपेक्षित होते. पण त्यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याचा उल्लेख केला म्हणून दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की, सकाळीच झालेला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती असलेला होता आणि संध्याकाळी जो झाला तो वातानुकूलित सभागृहातील उसनवारीचा मेळावा होता, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

'मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तुकडे-तुकडे गँगची भाषा' -

जी भाषा तुकडे तुकडे गँग बोलत होते, आज ती भाषा शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणात झळकते की काय? हा सवाल आहे. तुकडे-तुकडे गँगने काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आणि आता उसनवारीमध्ये तुकडे-तुकडे गँगची भाषा हे बोलायला लागले? आमची नम्र विनंती आहे. हात जोडून विनंती आहे, भाजपला घालून पाडून बोला, आमच्यावर टीका करा, आम्ही त्याचे उत्तर द्यायला समर्थ आहोत. पण संविधान आणि संघराज्य पद्धतीला नख लावू नका. याच तुकडे-तुकडे गँगला महाराष्ट्रात रेड कार्पेट तुमच्याच सरकारने घातले होते. म्हणून आम्हाला चिंता वाटते या तुकडे तुकडे गँगच्या भाषेचा आम्ही त्याचा निषेध आम्ही करतो, असा चिमटा अशिष शेलार यांनी काढला आहे.

हेही वाचा - नवहिंदूंपासूनच हिंदूत्वाला धोका; मुख्यमंत्र्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह केंद्रावर सोडले टिकास्त्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.