मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यासोबतच रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री, आदित्य ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवादन केलं. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच, असा विश्वास देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ मुंबई महापालिकेचे प्रशासक आय. एस. चहल मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदीनीही हुतात्म्यांना स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारक येथे विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, त्याचबरोबर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, विरोधी पक्षनेते विधानसभा देवेंद्र फडवणीस व त्यांच्यासोबत भाजपच्या असंख्य आमदारांनी हुतात्मा चौक येथे जाऊन पुष्पांजली अर्पण करून हुतात्मा स्मारकास अभिवादन केले.
-
Maharashtra CM Uddhav Thackeray along with his wife Rashmi Thackeray, state minister Aaditya Thackeray and others paid tribute to those who sacrificed their lives for the Samyukta Maharashtra Movement at Hutatma Chowk in Mumbai on the occasion of 62nd Maharashtra Formation Day pic.twitter.com/rypcuafvXo
— ANI (@ANI) May 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra CM Uddhav Thackeray along with his wife Rashmi Thackeray, state minister Aaditya Thackeray and others paid tribute to those who sacrificed their lives for the Samyukta Maharashtra Movement at Hutatma Chowk in Mumbai on the occasion of 62nd Maharashtra Formation Day pic.twitter.com/rypcuafvXo
— ANI (@ANI) May 1, 2022Maharashtra CM Uddhav Thackeray along with his wife Rashmi Thackeray, state minister Aaditya Thackeray and others paid tribute to those who sacrificed their lives for the Samyukta Maharashtra Movement at Hutatma Chowk in Mumbai on the occasion of 62nd Maharashtra Formation Day pic.twitter.com/rypcuafvXo
— ANI (@ANI) May 1, 2022
हेही वाचा - 1 May Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्ताने जाणून घेऊया मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची यशोगाथा