मुंबई - पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात झालेल्या ढगफुटी Chief Minister took notice of the cloudburst सदृश्य पावसाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दखल घेत, तातडीने बाधित्ताने आवश्यक ती मदत पुरवण्याची निर्देश मध्यरात्री उशिरा दिले आहेत. तसेच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची Panchnama of damage in rain affected villages मदतकार्याची माहिती घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
राज्यात पावसाचे पुनरागमन - दडी मारलेल्या पावसाने पुण्याला राज्यातील अनेकांना झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी देखील राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस Heavy rain in Maharashtra कोसळला. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे.
मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - Amit Shah Security Breach : गृहमंत्री अमित शाह यांची सुरक्षा व्यवस्था भेदली.. संशयिताला पोलिसांकडून अटक
हेही वाचा - Heavy Rain In Maharashtra : राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्याता