नवी मुंबई : सक्तीच्या गृह विलगीकरणात असूनही सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या 4 कोरोनाग्रस्तांवर नवी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा आता उगारला जात आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीत कोव्हिड-19 संदर्भातील प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. या कारवाईअंतर्गत विलगीकरणात असतानाही शहरात फिरणाऱ्या 4 कोरोनाग्रस्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात नेरूळमधील एका दाम्पत्यासह जुईनगरमधील दोन महिलांचा समावेश आहे.
नेरूळमधील दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल
कोरोनाची लागण झाल्याने गृह विलगीकरण सक्तीचे असूनही शहरात फिरणाऱ्या नेरूळ येथील एका दाम्पत्याविरुद्ध घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी फिरत सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात कलम 188 अंतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
जुईनगर मधील दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
जुईनगर सेक्टर 24 मधील एका सोसायटीतील 2 कोरोनाग्रस्त महिलाही सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळल्यानंतर त्यांच्यावरही नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाची लागण झालेली असतानाही बाहेर फिरणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल
या कारवाईअंतर्गत विलगीकरणात असतानाही शहरात फिरणाऱ्या 4 कोरोनाग्रस्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात नेरूळमधील एका दाम्पत्यासह जुईनगरमधील दोन महिलांचा समावेश आहे.