ETV Bharat / city

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 160 रेल्वे प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई - Central Railway Zone

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण 160 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) - 2003 अंतर्गत 29 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये मुंबई विभागातून 67 प्रकरणे 13 हजार 200 रुपये दंड, भुसावळ व नागपूर विभागातून प्रत्येकी 37 प्रकरणे 7 हजार 400 रुपये दंड, पुणे विभागातील 9 प्रकरणे व दंड 1 हजार 500 रुपये दंड आणि सोलापूर विभागातील 10 प्रकरणे 200 रुपये दंड वसूल करण्यात आले.

Central Railway Zone
Central Railway Zone
author img

By

Published : Feb 27, 2022, 3:10 PM IST

मुंबई - मुंबई लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन करण्याचा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झालेला होता. त्यानंतर रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेत हाती घेतली असून अवघ्या दोन दिवसांत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 160 व्यक्तींवर कारवाई केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

अवघ्या दोन दिवसात कारवाई - हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये गुरूवारी (दि. 24 फेब्रुवारी) सकाळी 9 वाजून 17 मिनिटांत एका प्रवासी गटाकडून अमली सदृश पदार्थाचे सेवन करत असल्याची घटना घडली. याला इतर प्रवाशांनी विरोध केला. मात्र, त्याचा प्रकार सुरूच राहिला. आम्हाला काही फरक नाही पडणार, आताच तुरूंगातून जाऊन आलो आहे, असे त्या गटातील एक जण बोलला. तसेच सहप्रवाशांबरोबर हुज्जत घातली. दरम्यान, एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल केला. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागाने या व्हिडिओची दखल घेतली आहे. तसेच, आरपीएफकडून या घटनेची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. 24 आणि 24 फेब्रुवारी, 2022 या दोन दिवसांत धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेत 160 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई - मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण 160 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) - 2003 अंतर्गत 29 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये मुंबई विभागातून 67 प्रकरणे 13 हजार 200 रुपये दंड, भुसावळ व नागपूर विभागातून प्रत्येकी 37 प्रकरणे 7 हजार 400 रुपये दंड, पुणे विभागातील 9 प्रकरणे व दंड 1 हजार 500 रुपये दंड आणि सोलापूर विभागातील 10 प्रकरणे 200 रुपये दंड वसूल करण्यात आले.

हेही वाचा - Sanjay Raut on raids : केंद्रिय एजन्सींना केवळ महाराष्ट्रातच काम आहे - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.