मुंबई - बुली बाई App (Bulli Bai App Case) प्रकरणी आरोपी औमकारेश्वर ठाकूर आणि मूळचा ओडिशाचा नीरज सिंग यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. तसेच बुली बाईचे संस्थापक नीरज बिश्नोई याच्या पोलीस कोठडीत (Police Custody) 31 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'Bulli Bai' app case : ओडिसामधून पाचव्या आरोपीला केले अटक; मुंबई पोलीसांची कारवाई, तिघांचे जामिन फेटाळले
काय आहे प्रकरण?
बुली बाई अॅपच्या माध्यमातून आरोपी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक शीख समुदायाशी निगडित नावे वापरली होती. समाजातील एकात्मता आणि सलोखा भंग व्हावा, हा या आरोपींचा उद्देश असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात केला होता. मुस्लीम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लीम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुली बाई या अॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. ट्विट, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून महिलांची माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत App वर टाकण्यात आले होते. अशा 100 हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - Bulli Bai App Case : महाराष्ट्र पोलिसांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय - गृहमंत्री