मुंबई: शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? या वादावर आता निवडणूक आयोगाने Election Commission तात्पुरता तोडगा काढल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मशाल हे निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आल आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक मशाल घेऊन, त्यांना समर्थन देण्यासाठी मातोश्रीवर जात आहेत. मातोश्रीवर येणाऱ्या या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी ही मशाल अन्याय आणि गदारांना जाळणारी आहे असा कानमंत्र देत हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
या मशालीचे तेज त्याचा धोखा सगळं लक्षात घ्या कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही मशाल अन्याय गद्दारी जाळणारी आहे. या मशालीचे महत्व, तेज त्याचा धोखा सगळं लक्षात घ्या. आज तुम्ही आलात मनापासून धन्यवाद देतो. आता हे चिन्ह महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचवा. ही मशाल प्रत्येक शिवसैनिकापर्यंत प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा. असे आदेश उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जमलेल्या शिवसैनिकांना दिले आहेत.
शिवसैनिक शिवाजी पार्कला मशाल घेऊन आले वांद्रे विधानसभेमधील काही शिवसैनिक मशाल घेऊन बाईक रॅलीने मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत निवडणुकीच्या रिंगणात आपण पूर्ण ताकतीने निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवणार असल्याच आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. हे शिवसैनिक शिवाजी पार्कला मशाल घेऊन आले होते. त्यानंतर शिवसैनिक मातोश्रीबर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.