मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. राज ठाकरे यांची अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावले आहेत.
आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचे प्रमुख कारण असले तरी देखील यामध्ये राजकीय चर्चा होणार नाही, असे होऊ शकणार नाही. आरोग्यविषयक चर्चे बरोबरच पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.