ETV Bharat / city

Breaking news; मुंबईच्या ४४८ उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग मोकळा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा पुढाकार!

Breaking news live page 11 June 2022
Breaking news live page 11 June 2022
author img

By

Published : Jun 11, 2022, 9:37 AM IST

Updated : Jun 11, 2022, 10:11 PM IST

21:47 June 11

मुंबईच्या ४४८ उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग मोकळा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा पुढाकार!

मुंबई- रेल्वेमध्ये २०१८मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाचा मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली.मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार आहे.

21:41 June 11

भारतीय फुटबॉल संघाने इतिहास रचला, FIFA नेशन्स कप 2022 साठी पात्र

नवी दिल्ली - भारताने शनिवारी फिफा नेशन्स कप-2022 साठी पात्र ठरून इतिहास रचला. या वर्षी 27 ते 30 जुलै दरम्यान कोपनहेगन, डेन्मार्क येथे होणार्‍या एस्पोर्ट्स शोपीस स्पर्धेत भारत प्रथमच खेळणार आहे. फिफा नेशन्स सिरीज 2022 च्या प्लेऑफमध्ये कोरिया आणि मलेशियाचा पराभव करून भारत शोपीस स्पर्धेसाठी पात्र ठरला.

20:17 June 11

अमरावतीत वादळ मॉलच्या काचा तुटून पडल्या, नमुना परिसरात घरावर कोसळले झाड

अमरावती- शहरात शनिवारी दुपारी आणि सायंकाळी काही भागात जोरदार वादळासह पाऊस कोसळला. या वादळाचा फटका शहराच्या गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक बसला असून शहरातील प्रसिद्ध अश्या जे एन डी मॉलच्या इमारतीला बाहेरून लावलेले काच वादळामुळे खाली कोसळले. नमुना परिसरात भल्यामोठ्या वाडाच्या झाडाची फांदी एका घरावर कोसळल्यामुळे खळबळ उडाली

19:01 June 11

भाजपचे माजी आयटी सेल प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे- प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल यांच्याविरोधात पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी झाकीर इलियास शेख यांनी फिर्याद दिली आहे.

18:40 June 11

इतर व्यवसायाप्रमाणे वेश्या व्यवसायलादेखील मान्यता मिळाली पाहिजे - अमृता फडणवीस

पुणे - माझे तर सरकारला हे सांगणं आहे की इतर व्यवसायांप्रमाणे वेश्या व्यवसायालादेखील डिग्नीटी मिळाली पाहिजे. त्यांना एक प्रोफेशन म्हणून ते स्वीकारले पाहिजे. जर्मन सारख्या देशात तर त्याकडे खूप आदराने पाहिले जाते. त्यावर कर वसुल केला जातो. आपल्याकडेही ते व्हायला पाहिजे, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

16:40 June 11

गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तारांचा नंबर पहिला असला पाहिजे - आमदार संतोष दानवे

जालना -अब्दुल सत्तार यांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली. विधानपरिषद निवडणुकीतही ते आम्हाला मदत करतील, भाजप आमदार संतोष दानवे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

16:17 June 11

नुपूर शर्मांचा निषेध करत दिल्लीत जामा मशीद समोर मोर्चा

नवी दिल्ली - भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा निषेध करत जामा मशीदसमोर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव एकत्रित आले आहेत. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपमधून काढावे अशी त्यांनी मागणी केली आहे.

15:52 June 11

राज्यसभा निवडणूक हा सत्याचा विजय- अमृता फडणवीस

पुणे- मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.यावर अमृता फडणवीस यांनी आपल मत व्यक्त केलं आहे

14:59 June 11

नवी मुंबईत इमारतीचे कोसळले छत, इमारतीमध्ये अडकले नागरिक

मुंबई - नेरुळमधील जिमी पार्क इमारतीचे छत कोसळले आहे. सहाव्या मजल्यापासून खालपर्यंत छत कोसळत आले आहे. इमारतीमध्ये नागरिक अडकले आहे.

14:53 June 11

सहा राज्यसभेच्या जागापैकी भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी

मुंबई- महाराष्ट्रातील सहा राज्यसभा जागांपैकी भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. यामध्ये अनिल बोंडे, धनंजय महाडिक, पियूष गोयल यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीतील संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल यांचा विजय झाला आहे.

10:03 June 11

पवारांच्या पराभवावर छत्रपती संभाजीराजे यांचे लक्षवेधी ट्विट

कोल्हापूर - या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती. पण निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा ४२ मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज केलेले ट्विट हे निश्चितच वास्तविकता दर्शवित आहे.

09:46 June 11

आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातून अक्कलकुवा येथे तुफान दगडफेक

नंदुरबार - आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातून अक्कलकुवा येथे रात्री तुफान दगडफेक झाली. दुचाकींसह चारचाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. रात्री 12 नंतर हा प्रकार घ़डला. पोलीस स्टेशन मधून परतत असताना काही जणांनी केलेल्या दगडफेकीनंतर वातावरण चिघळले. झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरीमता मंदिर परिसरात मोे नुकसान झाले. अक्कलकुव्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झालेत. आरोपींचा शोध सुरु केला आहे.

09:20 June 11

अमरावती- शहरात शनिवारी दुपारी आणि सायंकाळी काही भागात जोरदार वादळासह पाऊस कोसळला. या वादळाचा फटका शहराच्या गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक बसला असून शहरातील अशा जे एन डी मॉलच्या इमारतीला बाहेरून लावलेले काच वादळामुळे खाली कोसळले. नमुना परिसरात भल्यामोठ्या वाडाच्या झाडाची फांदी एका घरावर कोसळली आहे.

पुणे - देवेंद्र फडणवीस यांना माणसं विविध मार्गाने आपलीशी करण्यात यश आलेले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक निकालानंतर दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

Last Updated : Jun 11, 2022, 10:11 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.