ETV Bharat / city

Prasad Lad सरकारनं जाहीर केलेल्या विम्याचा गोविंदा पथकांनी लाभ घ्यावा, प्रसाद लाड यांचे आवाहन

हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचला जातो. काही वेळा मानवी मनोरा रचताना थर पडल्याने अनेक गोविंदांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचपार्श्वभूमीवर गोविंदा पथकाने विम्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसाद लाड यांनी केलं prasad lad on govinda pathak insurance cover आहे.

Prasad Lad
Prasad Lad
author img

By

Published : Aug 17, 2022, 10:46 PM IST

मुंबई - दहीहंडी गोपाळकाला हा सण अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यात हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढावर आपल्याला नवी नाही. हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचला जातो. यासाठी या गोविंदा पथकांची तयारी अनेक दिवस सुरू असते. मात्र, काही वेळा मानवी मनोरा रचताना थर पडल्याने अनेक गोविंदांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या गोविंदाना विमा संरक्षण देण्याचा मुद्दा वारंवार समोर येत असतो. यावेळी शिंदे फडणवीस सरकार तर्फे प्रत्येक गोविंदा पथकाला दहा लाखाचा विमा जाहीर झाला prasad lad on govinda pathak insurance cover आहे.

भाजपकडून 10 लाखांचा विम्याच्या संदर्भात बोलताना भाजपचे नेते व आमदार प्रसाद लाड म्हणाले की, "आज पासून पुढे 19 तारखेपर्यंत अशी सराव शिबिर सुरू राहतील. 19 तारखेला खऱ्या अर्थाने आपण दहीकाला साजरा करू. मी सर्वांना एकच विनंती करतो, आपण जेव्हा थर लावता तेव्हा आपल्याला स्वतःला आणि आपल्या सहकाऱ्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊनच थर लावावेत. कारण, आपल्या घरी आपली लोक वाट पाहत आहेत. आमच्या पक्षाच्या मार्फत प्रत्येक मंडळाला दहा लाखाचा विमा जाहीर केला गेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मंडळांच्या नोंदी करून या विम्याचा लाभ घ्यावा."

आमदार प्रसाद लाड आणि मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेंची प्रतिक्रिया

दोन वर्षे काहीच नाहीतर, या संदर्भात बोलताना मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे म्हणाले की, "प्रभादेवीत नेहमीच काही ना काही सण उत्सव होत असतात. अशा प्रभादेवीत आम्ही दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन केले. मागची दोन वर्ष कोरोनामुळे कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, आता सर्वकाही शिथिल झाल्यानंतर आम्ही परत त्याच जोमाने दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन केले आहे. यापुढे देखील आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम आणि शिबीर नक्कीच करत राहू."

दरम्यान, दहीहंडी उत्सव होता तोंडावर आलेला असताना मुंबई गोविंदा पथकांच्या सराव शिबिरांना आता सुरुवात झाली आहे. अशाच एका शिबिराचे मुंबईतील प्रभादेवीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे व आमदार प्रसाद लाड यांनी गोविंदा पथकांना मार्गदर्शन केलं.

हेही वाचा - Ajit Pawar सिंचन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाकडून अजित पवारांना क्लीनचिट नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.