ETV Bharat / city

Big B Plea in High court : अभिनेते अमिताभ बच्चन यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; बंगल्याची भिंत पाडण्यास स्थगिती - Amitabh Bachchans plea in Mumbai High Court

मुंबई महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचा विचार ( road expansion by BMC ) करावा, आवश्यक असल्यास अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला आदेश ( high court order on Amitabh Case ) दिले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासाठीच्या भूखंडाचा काही भाग पालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी ( Juhu Road Widening ) घेतला जाणार आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Feb 23, 2022, 2:57 PM IST

Updated : Feb 24, 2022, 9:20 AM IST

मुंबई - बॉलिवूडचे शहेनशाह, मेगास्टार, बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडण्यास स्थगिती देण्यात आली आहे. रस्त्यासाठी भिंत पाडण्यासाठी पालिकेने नोटीस दिली होती. पण बंगल्याची संरक्षण भिंत तूर्तास न पाडण्याचे मुंबई पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेनं जुहूतील प्रतीक्षा बंगल्याची संरक्षक भिंत तोडून काही जागा ताब्यात घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली होती, मात्र त्या नोटीशीला अमिताभ बच्चन यांनी कोर्टात आव्हान दिलं. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं न्यायालयानं बच्चन यांना नोटीसीबाबत महापालिकेकडे दोन आठवड्यात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यावर महापालिकेनं सहा आठवड्यात निर्णय घ्यावा. मात्र निर्णय घेतल्यानंतर तीन आठवडे त्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत, त्यामुळं बीग बी अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा-Anmol Ambani Khrisha Wedding : अनमोल अंबानी आणि ख्रीशा शाह यांच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटींची हजेरी

हेही वाचा-अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात उलगडणार 'राध्ये श्याम'ची गाथा

काय आहे प्रकरण

जुहूतल्या एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या परिसरात एक शाळा, दोन मॉल आणि दोन चित्रपटगृहे आहेत. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूकीती वर्दळ असते. वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागते. याचा येथून जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधून पालिकेने या मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन हे कामही जवळपास पूर्णही झाले आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी या दोघांनाही नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मिळताच के. व्ही. सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगिती आदेश देण्यास नकार दिल्याने पालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अमिताभ यांनी आपल्या बंगल्यामधील काही जागा रस्तारुंदीकरण करण्यास देण्यास आधीच देण्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा-Amitabh Bachchan Bungalow : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची जागा ताब्यात घेण्यासाठी मुंबई महापालिकेला कंत्राटदाराची 'प्रतीक्षा'

Last Updated : Feb 24, 2022, 9:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.