ETV Bharat / city

Dharmendra : माझ्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नका - बॉबी देओल - अभिनेते धर्मेंद्र मराठी बातमी

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना तब्येत खालावल्याच्या कारणाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलने माहिती देता अफवा ( Bobby Deol On Dharmendra Health ) पसरवणाऱ्यांना खडसावले आहे.

Dharmendra bobby deol
Dharmendra bobby deol
author img

By

Published : Jun 6, 2022, 3:48 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ( Actor Dharmendra ) यांना तब्येत खालावल्याच्या कारणाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी ( Breach Candy Hospital ) दाखल करण्यात आले होते. यापूर्वी सुद्धा त्यांना गेल्या महिन्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. आता त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, यासगळ्यात धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता बॉबी देओलनं त्यांच्या प्रकृतीबाबत बोलणाऱ्यांवर संतापजनक प्रतिक्रिया दिली ( Bobby Deol On Dharmendra Health ) आहे.

'धर्मेंद्र सुखरूप आहेत' - बॉबी देओल यांनी म्हटलं की, माझे वडिल सुखरुप ( Bobby Deol Say Dad Dharmendra is Absolutely Fine ) आहेत. कृपया करुन त्यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. जे कोणी असे करत असतील त्यांनी कृपया करुन हा प्रकार थांबवावा, असे आवहान बॉबीने केलं आहे. वाढत्या वयामुळे होणारे आजाराच्या कारणाने धर्मेंद्र यांना अनेकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. मागील महिन्यात देखील त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते.

धर्मेंद्र यांचा मोठा चाहता वर्ग - आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील अभिनयासाठी केवळ भारतातच नाहीतर जगभरातील बॉलीवूडच्या चाहत्यांना निखळ आनंद देणारे अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांचे नाव घेता येईल. सध्या ते ८६ वर्षांचे आहेत. गेल्या पाच दशकांपासून धर्मेंद्र यांनी बॉलीवूडसाठी योगदान दिले आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असणारे धर्मेंद्र हे चाहत्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेयर करत असल्याचे दिसून येते. ते चाहत्यांशी सोशल मीडियाच्या आधारे संवादही साधत असतात. मनोरंजन क्षेत्रातील काही रियॅलिटी शोमध्ये देखील धर्मेंद्र यांचा सहभाग चाहत्यांसाठी खास चर्चेचा विषय असतो. धर्मेंद्र लवकरच २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहेत. या सिनेमात धर्मेंद्रसोबत त्यांचा नातू करण देओल तसेच सनी देओल देखील दिसणार आहेत. धर्मेंद्र यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा - Mumbai Police at Salman Khan house : सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल, सुरक्षेचा घेणार आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.