ETV Bharat / city

विनामास्क सार्वजनिक ठिकाणी "नो इन्ट्री", लस न घेतल्यास होणार कारवाई - नो इन्ट्री

मुंबईत कोरोना विषाणूचा ( Coronavirus ) प्रसार आटोक्यात आहे. मात्र, साऊथ आफ्रिकेत ओमीक्रोन ( Omicron ) हा कोरोनाचा नवीन विषाणू ( Corona Update ) आढळून आला आहे. तसेच युरोपमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी लसीचे दोन डोस घेतले असतील अशाच नागरिकांना प्रवेश दिला जावा. तसेच विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपट गृह अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ( BMC ) आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

Mask
मास्क
author img

By

Published : Nov 27, 2021, 10:49 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा ( Coronavirus ) प्रसार आटोक्यात आहे. मात्र, साऊथ आफ्रिकेत ओमीक्रोन ( Omicron ) हा कोरोनाचा नवीन विषाणू ( Corona Update ) आढळून आला आहे. तसेच युरोपमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी लसीचे दोन डोस घेतले असतील अशाच नागरिकांना प्रवेश दिला जावा. तसेच विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपट गृह अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ( BMC ) आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

आढावा बैठक -

साऊथ आफ्रिकामध्ये ओमीक्रोन ( Omicron Virus ) हा कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. तसेच युरोपमध्ये काही देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला नुकताच धोक्याचा इशारा दिला आहे. कोविड विषाणूचा नवीन प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करून काही निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर आज पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली.

लस न घेतल्यास "नो इन्ट्री" -

या आढावा बैठकीत कोविड विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, असे वारंवार बजावूनही बरेचसे नागरिक बेफिकीरपणे वावरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे आयुक्त म्हणाले. योग्य प्रकारे मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानेही पुन्हा कडक कारवाई सुरू करावी. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर दिला पाहिजे. विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपट गृह अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले. मुंबईमध्ये कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक पूर्ण केले तसे आता दुसरी मात्रा देण्याचे लक्षांक देखील तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, या मुद्द्यावरही चहल यांनी भर दिला.

जीनोम स्क्विन्सिंग करावे -

ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पासपोर्ट काटेकोरपणे तपासावे. संबंधित प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत किंवा काय याबाबत काटेकोर वैद्यकीय तपासणी करावी, त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण करावे, बाधित नमुन्यांचे जीनोम स्क्विन्सिंग ( Genome Sequencing ) करावे. तसेच बाधिताच्या सानिध्यातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. नवीन विषाणूच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील निर्देश दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

प्रवासाची माहिती संकलित करा -

आफ्रिकन देशांमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा लक्षात घेता मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी. नवीन विषाणू प्रकाराने बाधित असलेल्या आफ्रिकन देशांमधून थेट मुंबईत येणारी विमाने नाहीत, ही तूर्तास दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून मुळीच चालणार नाही. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसातील आपल्या प्रवासाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यांचे पासपोर्ट विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना लवकरच प्राप्त होणे अपेक्षित असून त्यानुसार विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचणी, अलगीकरण इत्यादींबाबत सविस्तर सूचना महानगरपालिकेच्या वतीने निर्गमित करण्यात येतील, विमानतळावर व्यवस्था वाढवताना कोणतीही कमतरता राहणार नाही, या दृष्टीने सुसज्ज राहावे, असे त्यांनी नमूद केले.

तयारी सुरू करा -

पुढे ते म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोविड सेंटर योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घ्यावा, अशा सूचना चहल यांनी केल्या. कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या दिशेने सर्व विभागीय कार्यालयांनी वॉर्ड वॉर रूम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना नव्याने कराव्या लागतील, त्याचा आढावा घ्यावा. झोपडपट्टी व तत्सम भागांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून किमान पाच वेळा पूर्ण निर्जंतुकीकरण करावे. सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपायोजना करण्याच्या दृष्टीने पुन्हा तयारीला लागावे. रुग्णवाहिका व इतर वाहने उपलब्ध होतील, यासाठी पूर्व तयारी सुरू करावी इत्यादी विविध सूचना चहल यांनी याप्रसंगी केल्या.यावेळी टास्क फोर्स चे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक यांनी देखील मार्गदर्शन केले.

हे ही वाचा - Maharashtra Govt fresh rules : कोरोनाच्या काळात राज्य सरकारचे पुन्हा नवीन निर्बंध, परराज्यातून येणाऱ्या प्रवाशाकरिता हे आहेत नियम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.