ETV Bharat / city

BMC Corruption : मृत्यू दाखल्यासाठी पैशांची मागणी करणारा पालिका कर्मचारी निलंबित - मुंबई महापालिका मृत्यू दाखल लाच

mumbai
mumbai
author img

By

Published : Jan 29, 2022, 10:26 PM IST

मुंबई - जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकांचा मुंबई महापालिका ( Mumbai Munciple Corporation ) कार्यालयाशी संपर्क येतो. या दरम्यान विविध कामांसाठी पैशांची मागणी केली जाते. असाच एक प्रकार पालिकेचा आर मध्य कार्यालयात समोर आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला व त्याच्या प्रती देण्यासाठी पैशांची मागणी ( BMC Employee Ask Bribe For Death Certificate ) पालिका कर्मचाऱ्याने केली. त्याची ट्विटरद्वारे ( BMC Bribe For Death Certificate ) तक्रार आल्यावर पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मृत्यू प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी -

मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयामध्ये मृत्‍यू नोंदणी कारकून म्हणून कार्यरत संतोष तांबे हे बाभई हिंदू स्‍मशानभूमी येथे १७ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या रात्रपाळीत कार्यरत होते. त्यावेळी राजेंद्रकुमार कृष्‍णदास कि‍नारीवाला (७२) यांचे पार्थिव अंतिमसंस्‍कार करण्यासाठी १८ जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजता बाभई स्‍मशानभूमीत आणण्यात आले होते. अंतिम संस्‍कार करुन आटोपल्यावर मृत्‍यू दाखला कुठे मिळेल, याबाबत शशांक राव यांनी कर्तव्‍यावर हजर असलेले मृत्‍यू नोंदणी कर्मचारी संतोष तांबे यांच्‍याकडे विचारणा केली. त्‍यावेळी तांबे यांनी मृत्यू दाखला मी काढून देऊ शकतो, असे सांगून प्रत्‍येक दाखल्‍याच्‍या प्रतीसाठी १०० रुपये लागतील, असे सांगितले. राव यांनी ५ प्रती पाहिजे, असे सांगून तांबे यांना ५०० रुपये दिले.

कर्मचारी निलंबित -

शशांक राव यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटरवर ( @mybmc ) तक्रार केली. आर/मध्‍य विभाग अंतर्गत कार्यरत एका कर्मचाऱ्याने पैशांची मागणी करुन ते स्वीकारल्‍याबद्दल ही तक्रार होती. त्याची तातडीने दखल घेऊन महानगरपालिकेचे उपआयुक्‍त ( सार्वजनिक आरोग्य ) आणि कार्यकारी आरोग्‍य अधिकारी यांनी दिलेल्‍या दूरध्‍वनी आदेशानुसार आर/मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी यांनी बाभई स्‍मशानभूमीमध्‍ये जाऊन तक्रारीची शहानिशा केली. त्‍यावेळी त्‍यांना या तक्रारीत तथ्‍य असल्‍याचे आढळले. यामुळे पालिका प्रशासनाने संतोष तांबे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा - BJP MLA Suspension Quashes : 'लक्षात घ्या, भाजप आमदारांना न्यायालयानं सुनावलं आहे' : नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.