मुंबई - मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेत असलेल्या आरोग्य सेविकांनी (सीएचव्ही वर्कर) आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यावर पालिका आयुक्तांनी एका समितीची नियुक्ती करून त्यांच्या अहवालानुसार निर्णय घेण्याचे मान्य केले होते. मात्र आयुक्तांचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागाण्यांकडे दूर्लक्ष होत असल्याने पालिका आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी महानगर पालिका आरोग्य कर्मचारी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनानंतर समितीची नियुक्ती - किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड, सहा महिन्यांचा ब्रेक रद्द करणे, व्हेंडर पद्धत रद्द करणे , आरोग्य सेविकांना (सीएचव्ही) पालिकेच्या सेवेत कायम करावे आदी प्रमुख मागण्यांसाठी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांच्या नेर्तृत्वाखाली मार्च महिन्यात काम बंद आंदोलन करण्यात आले. आझाद मैदानात धरणे आंदोलनही करण्यात आले होते. याची दखल घेत ११ मार्चला पालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाला भेट देत बैठक आयोजित केली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांची समिती नियुक्त केली गेली.
आश्वासनाची पूर्तता करा - पालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी १४, १६ आणि २१ मार्चला बैठक झाली. या समितीने आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालाबाबत आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार अधिवेशन संपल्यावर २८ मार्चनंतर आरोग्य सेविकांच्या प्रश्नावर बैठक घेतली जाणार होती. मात्र अद्याप बैठक झाली नसल्याने आयुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आयुक्तांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करावी असे आवाहन संघटनेद्वारे आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे करण्यात आले असल्याची माहिती संघटनेने अॅड. प्रकाश देवदास यांनी दिली.
पालिका आयुक्तांनी आश्वासनाची पूर्तता करावी - आरोग्य कर्मचाऱ्यांची पत्राद्वारे मागणी - bmc health workers letter to commissinor
पालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी १४, १६ आणि २१ मार्चला बैठक झाली. या समितीने आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालाबाबत आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार अधिवेशन संपल्यावर २८ मार्चनंतर आरोग्य सेविकांच्या प्रश्नावर बैठक घेतली जाणार होती. मात्र अद्याप बैठक झाली नसल्याने आयुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.