मुंबई - मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महपौर ( bjp win mumbai corporation election ) बसेल, असा विश्वास भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला ( bjp mla amit satam ) आहे. तसेच, सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भाजपचा संबंध नसल्याचेही साटम यांनी सांगितले आहे.
'भाजपचा संबंध नाही' - भाजपाची नियमीत कार्यकारणी बैठक आज ( 25 जून ) येथील वसंत स्मृती येथे संपन्न झाली. या बैठकीची माहिती देताना साटम बोलत होते. यावेळी बोलताना साटम म्हणाले की, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात पालिका निवडणुक तयारीबाबत चर्चा झाली. राज्यात सध्या राजकीय भूकंप झाला असून, त्याच्या मागे भाजप असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, आताच्या परिस्थितीशी भाजपचा संबंध नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, असे साटम यांनी म्हटलं.
'स्वतःच अपयश लपविण्यासाठी...' - पालघरमध्ये साधूंची हत्या, सचिन वाझेला कामावर परत घ्या, अनिल देशमुख यांना शंभर कोटी घ्यायला, तुमच्या आमदारांना भेटू नका, मंत्रालयात जाऊ नका, असे भाजपाने सांगितलं होत का?, असा प्रश्न साटम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, स्वत:च अपयश लपवण्यासाठी भाजपवर आरोप केला जात असल्याचा पलटवारही साटम यांनी शिवसेनेवर केला आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना आमदारांच्या बंडाळी मागे भाजपचा हात; मनीषा कायंदे यांची टीका