ETV Bharat / city

BJP Will Claim Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता - भाजप सत्तेचा दावा करणार

महाराष्ट्रातील घडलेल्या राजकीय भूकंपानंतर ( After the political earthquake ) काल अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा ( After Resignation of CM Uddhav Thackeray ) दिला. त्यानंतर आज भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ( Meeting at the Sea Residence ) होणार आहे. बैठकीली राज्याचे प्रभारी सी. टी. रवी हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप सत्तेचा दावा करणार ( BJP Will Claim Power ) आहेत. त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार असून, मंत्रिमंडळासंबंधी कोणा कोणाला खाती वाटप करणार यासंबंधी चर्चा होणार आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 30, 2022, 10:10 AM IST

Updated : Jun 30, 2022, 11:17 AM IST

मुंबई : महाराष्ट्रातील घडलेल्या राजकीय भूकंपानंतर ( After the political earthquake ) काल अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ( After Resignation of CM Uddhav Thackeray ) सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्या सागर निवासस्थानी होत आहे. या बैठकीला राज्याचे प्रभारी सी. टी. रवी ( In charge c. T. Ravi ) हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासाठी देवेंद्र फडवणीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस : देवेंद्र फडणवीस हे जनता पक्षाचे तरुण नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. फडणवीस हे महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद आहे. ते नागपूर नैऋत्य विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आहेत. मागील 2014 च्या विधान सभा निवडणुकीत त्यांनी युतीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 31 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी 44 व्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता 2019 च्या विधान सभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरीही युती तुटल्याने त्यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली होती. 2019 ला महाविकास आघाडी स्थापन होऊन सेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडली होती. त्यामुळे मी पुन्हा येईन! अशी घोषणा देणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदापासून दूर राहिले. परंतु आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे सेनेच्या बंडखोर आमदारांमुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असल्याने देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

उद्या शपथविधी होण्याची शक्यता : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळल्यानंतर, मी पुन्हा येईन असे सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आता थोडाच अवधी शिल्लक राहिलेला आहे. या संदर्भामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक आज देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानी सकाळी १०:३० वाजता होत आहे. या बैठकीमध्ये पुढील रणनीती आखली जाणार आहे. उद्या सायंकाळी शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. विशेष करून एकनाथ शिंदे गट अजून मुंबईमध्ये आलेला नाही आहे. कदाचित उद्या शपथविधीदरम्यान ते मुंबईत उपस्थित होतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिपदाबाबत खलबतं : त्याचबरोबर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करीत असताना कुठल्या नेत्यांना संधी देण्यात येणार तसेच शिंदे गटाला किती मंत्रिपद देण्यात येणार याबाबतही चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राम शिंदे यांना महत्त्वाची खाती देण्याबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार, संजय कुटे यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 30 जूनला देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन ( Devendra Fadnavis sworn in ceremony ) सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. तसेच, 1 जुलैला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा प्रकारची माहिती ( Shinde sworn in ceremony in Maharashtra ) सूत्रांकडून मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा आपल्या भाषणातून केली. त्यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच भारतीय जनता पक्षामध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.

एक तारखेला दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता - 1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडेल. मात्र त्यांच्या सोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अध्याप दोन्ही गटामध्ये खातेवाटप बाबत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Uddhav Thackerays Resignation : मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले, वाचा महत्त्वाचे ५ मुद्दे

Last Updated : Jun 30, 2022, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.